Atlantic Ocean Storms | अटलांटिक महासागरात वादळे झाली शांत!

Atlantic Ocean Storms |
Atlantic Ocean Storms | अटलांटिक महासागरात वादळे झाली शांत!
Published on: 
Updated on: 

टोकियो : अटलांटिक चक्रीवादळांच्या हंगामाला सुरुवात होऊन १०३ दिवस उलटले तरी अद्याप महासागरात एकाही 'हरिकेन'ची (तीव्र चक्रीवादळ) निर्मिती झालेली नाही. यापूर्वी २००२ (गुस्ताव) आणि २०१३ (हंबर्टो) मध्ये ११ सप्टेंबर रोजी पहिल्या हरिकेनची नोंद झाली होती. मात्र, उपग्रहाद्वारे हवामान नोंदी ठेवण्यास सुरुवात झालेल्या १९६६ नंतर प्रथमच पहिल्या हरिकेनची प्रतीक्षा इतकी लांबली असून हा नवा ऐतिहासिक विक्रम ठरला आहे.

कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीचे चक्रीवादळ तज्ज्ञ फिल क्लोट्झबॅक यांच्या मते, आत्तापर्यंत केवळ पाच अल्पायुषी उष्णकटिबंधीय वादळे निर्माण झाली असून, १९५० नंतरचा हा सर्वात शांत हंगाम ठरला आहे. १ सप्टेंबर रोजी 'एडवर्ड' हे लहान वादळ हरिकेन बनण्याच्या उंबरठ्यावर होते; परंतु टेक्सास-लुईझियाना किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी ते जमिनीवर पोहोचल्याने समुद्रातील उष्ण पाण्याच्या इंधनापासून वंचित राहिले आणि क्षमले.

'अल निनो'चा प्रभाव आणि 'विंड शिअर'चा अडथळा

सध्या समुद्राचे तापमान वादळांसाठी अनुकूल असले, तरी प्रशांत महासागरातील शक्तिशाली 'अल निनो'मुळे अटलांटिकवर तीव्र 'विंड शिअर' (वाऱ्याचा वेग आणि दिशेतील तीव्र बदल) निर्माण होत आहे. हा विंड शिअर नव्या चक्रीवादळांची रचना सहज मोडून काढत आहे. पॅसिफिकमधील उष्ण हवेमुळे अटलांटिक खोऱ्यात हवा खाली दबली जात असल्याने वादळे आकारास येत नाहीत.

धोका अजूनही टळलेला नाही

जरी संपूर्ण हंगामातील ५० टक्क्यांहून अधिक वादळे १० सप्टेंबरनंतर तयार होतात, तरी १९९२ चा कटू अनुभव विसरता येणार नाही. त्या वर्षी शांत हंगामातही 'अँड्र्यू' या कॅटेगरी-५ वादळाने फ्लोरिडामध्ये प्रचंड विध्वंस घडवला होता. शिवाय, चक्रीवादळ नसतानाही केवळ उष्णकटिबंधीय वादळांनी यंदा अमेरिकेत मोठा हाहाकार माजवला आहे. जूनमध्ये 'आर्थर' वादळामुळे लुईझियानातील कॉटनपोर्ट येथे २४ तासांत तब्बल २९.०६ इंच विक्रमी पाऊस पडला. पाठोपाठ 'एडवर्ड'मुळे पूर्व टेक्सासमध्ये २० इंचांहून अधिक पाऊस होऊन महापूर आला. त्यामुळे हरिकेन नसले तरी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा धोका कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news