अंतराळात नवा प्रयोग! स्पेसएक्स करवणार सर्वसामान्यांसाठी ‘स्पेसवॉक’!

आता सर्वसामान्यांनाही करता येणार स्पेसवॉक
SpaceX will attempt the first commercial spacewalk
आता सर्वसामान्यांसाठीही स्पेसवॉक करता येणार आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आतापर्यंत नासाच्या विविध मोहिमांमधून अंतराळ यात्री स्पेसवॉक करत आले आहेत. मात्र, आता सर्वसामान्यांसाठीही स्पेसवॉक करता येणार आहे. एलन मस्क यांच्या मालकीची ‘स्पेसएक्स’ ही एरोस्पेस कंपनी लवकरच पहिले व्यावसायिक स्पेसवॉक फ्लाईट लाँच करणार असून, त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. मिशन पोलरिस डॉन या मोहिमेंतर्गत प्रवासी स्वखर्चाने अंतराळात स्पेसवॉकचा आनंद यामुळे घेऊ शकणार आहेत. अंतराळ यानातून बाहेर पयेत अंतराळात चालणे याला ‘स्पेसवॉक’ असे संबोधले जाते.

SpaceX will attempt the first commercial spacewalk
डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अंतराळात उभारणार

या मोहिमेची प्रारंभिक घोषणा केली होती 2022 मध्ये

या मोहिमेची प्रारंभिक घोषणा 2022 मध्ये केली गेली होती. त्यानंतर विविध टप्प्यांत ही योजना प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरू होती. ती तयारी आता अंतिम टप्यात पोहोचली आहे. पोलरिस डॉनची योजना अंतराळात मनुष्याला अधिक काळ राहण्यानुरुप बनवण्याच्या दिशेने डिझाईन केली गेली आहे. पोलरिस मिशनच्या माध्यमातून अंतराळात मनुष्यावर होणार्‍या परिणामांवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. न्युरो ओक्युलर सिंड्रोम अर्थात एसएएनएस याचाही यात समावेश आहे. एखादी व्यक्ती अंतराळात मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये असते. त्यावेळी स्पायनल फ्ल्यूडचा दबाव मेंदू, डोळ्यांच्या नसाच्या आसपास असतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. असे सर्व धोके कसे टाळता येतील, यावरही यात भर दिला जाणार आहे.

SpaceX will attempt the first commercial spacewalk
अंतराळात अनोखा पल्सर तारा!

50 वर्षांत एकही मानव इतक्या दूर पाठवण्यात आलेला नाही

या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागील 50 वर्षांत एकही मानव इतक्या दूर पाठवण्यात आलेला नाही. 52 वर्षांपूर्वी 1972 मध्ये अपोलोची चांद्र मोहीम यशस्वी झाली. त्यावेळी नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या पटलावर पाऊल टाकणारे पहिली व्यक्ती ठरले होते. त्यानंतर स्पेसएक्सची पहिलीच मोहीम अशी आहे, ज्यात अंतराळात सर्वात दूरचे अंतर कापले जाणार आहे. 1965 मध्ये जेमिमी-4 वर अंतराळवीर एड व्हॉईट यांनी सर्वप्रथम स्पेसवॉक केले. त्यावेळी त्यांनी 21 मिनिटे स्पेसक्राफ्टच्या बाहेर व्यतित केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नियमितपणे स्पेसवॉक केले जाते.

SpaceX will attempt the first commercial spacewalk
अंतराळात गूढ रेडिओ सिग्नलमुळे खगोल शास्त्रज्ञांसमोर नवे आव्हान

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news