Space travel brain changes | अंतराळ प्रवासामुळे मानवी मेंदूच्या रचनेत बदल

‘नासा’च्या शास्त्रज्ञांचा खळबळजनक खुलासा
Space travel brain changes |
Space travel brain changes | अंतराळ प्रवासामुळे मानवी मेंदूच्या रचनेत बदल
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अंतराळात जाणे हे मानवी शरीरासाठी अत्यंत आव्हानात्मक असते, पण आता एका नवीन संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंतराळ प्रवासादरम्यान मानवी मेंदू कवटीच्या आत वरच्या आणि मागच्या बाजूला सरकतो आणि त्याच्या आकारातही बदल होतो, असे शास्त्रज्ञांच्या एका शोध पथकाने म्हटले आहे.

पृथ्वीवर असताना गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील द्रव पदार्थ आणि मेंदू खालच्या दिशेने खेचले जातात. मात्र, अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे हे द्रव डोक्याच्या दिशेने सरकतात, ज्यामुळे अंतराळवीरांचा चेहरा सुजलेला दिसतो. संशोधनानुसार, मायक्रोग्रॅविटीमध्ये (सूक्ष्म गुरुत्वाकर्षण) मेंदू कवटीमध्ये तरंगू लागतो. यामुळे मेंदू, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (मेंदूतील द्रव) आणि आजूबाजूच्या ऊतींमधील संतुलन बिघडते. संशोधकांनी 26 अंतराळवीरांच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅनचा अभ्यास केला. हे अंतराळवीर काही आठवड्यांपासून ते एका वर्षापर्यंत अंतराळात राहिले होते.

या अभ्यासातील काही महत्त्वाचे मुद्दे :

मेंदूचे सरकणे : अंतराळातून परतल्यानंतर मेंदू कवटीमध्ये वरच्या आणि मागच्या दिशेला सरकलेला आढळला. कालावधीचा परिणाम : अंतराळवीर जितका जास्त काळ अंतराळात राहिला, तितका हा बदल अधिक तीव्र असल्याचे दिसून आले.

विशिष्ट भागांवर परिणाम : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक वर्ष घालवणार्‍या अंतराळवीरांच्या मेंदूचा वरचा भाग 2 मिलीमीटरपर्यंत वर सरकला होता. कवटीच्या मर्यादित जागेत हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

हालचाल आणि संवेदना : शरीराची हालचाल आणि संवेदना नियंत्रित करणार्‍या मेंदूच्या भागांमध्ये सर्वाधिक बदल दिसून आले. यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये संपूर्ण मेंदूचा सरासरी विचार केला जात असे. मात्र, या नवीन संशोधनात मेंदूचे 100 हून अधिक विभागांमध्ये विभाजन करून अभ्यास करण्यात आला. यात असे दिसले की, मेंदूच्या दोन्ही बाजूंचे काही भाग विरुद्ध दिशेने सरकतात, जे सरासरी काढताना लक्षात येत नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news