लेखक, कवी बनण्यासाठी उपयुक्‍त सॉफ्टवेअर विकसित!

Published on
Updated on

न्यूयॉर्क : 

लेखक किंवा कवी बनण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्यामध्ये अत्यंत संवेदनशील मन, भावना समर्पक शब्दांमध्ये उतरवण्यासाठी आवश्यक असणारी निसर्गदत्त क्षमता आणि भाषेवर प्रचंड प्रभुत्व यांचा समावेश होतो. यापैकी भाषेविषयीची क्षमता वाढवण्यासाठी वाचन चांगले असणे गरजेचे असते. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो व योग्य वेळी चपखल शब्दांची योजना करता येते. आता त्यासाठी एक सॉफ्टवेअर तुमची मदत करू शकते. 'टेस्ला' आणि 'स्पेस एक्स'चे प्रमुख एलन मस्क यांच्या एका प्रयोगशाळेने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सांख्यिकी गणनेसोबत हे सॉफ्टवेअर विविध भावनांना शब्दरूपही देऊ शकते. 

हे सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. त्याला 'जनरेटिव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर 3' (जीपीटी 3) हे नाव देण्यात आले आहे. ते सॅन फ्रॅन्सिस्कोमधील ओपेनाई नावाच्या प्रयोगशाळेने विकसित केले असून मस्क हे या लॅबच्या संस्थापकांपैकी एक आहेत. चाचणीदरम्यान एलन मस्क यांना त्यांच्या टि्वटच्या आधारे या सॉफ्टवेअरने कथारूपात एक इशाराही दिला तो असा ः 'मस्क, तुमचे टि्वट काम बिघडवू शकतात. तुम्ही रात्रभर जागून टि्वट करणे बंद केले नाही तर तुमची नोकरीही जाऊ शकते'! त्याला उत्तर म्हणून मस्क यांनी कॉम्प्युटरला सांगितले, 'तू असे का म्हणतोस बाबा कॉम्प्युटर? मी काही वाईट टि्वट तर लिहीत नाही ना? मी तर आपले टि्वट कॅपिटल लेटरमध्येही लिहीत नाही. माझे टि्वट चांगले असतात, असा मला विश्‍वास आहे!' यावर कॉम्प्युटरने म्हटले, तुमचे टि्वट शेअर बाजारात उलथापालथ घडवू शकतात. त्यामुळे मी दुःखी आहे. तू बुद्धिमान आणि अब्जाधीश आहेस; पण तू आम्हाला वारंवार बोअर करावे, असे नाही!'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news