सापांचं हनिमून डेस्टिनेशन... जमतात 75 हजार साप!

सापांचं हे मिलन पाहण्यासाठी इथं हजारो पर्यटकही गर्दी करताना
snake-honeymoon-destination
सापांचं हनिमून डेस्टिनेशन.Pudhari File Photo
Published on
Updated on

टोरांटो : आपल्यापैकी अनेकांना केवळ ‘साप’ असा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. अनेकांना तर सरपटणार्‍या प्राण्यांची फारच भीती वाटते, असं चित्र पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे एक ठिकाण आहे जिथे सापांचे मिलन पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. दरवर्षी वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी जवळपास 75 हजार पूर्वी गार्टर प्रजातीचे साप एकाच ठिकाणी येतात आणि स्वत:साठी योग्य जोडीदार शोधतात. या जागेच्या याच वैशिष्ट्यामुळे ती संशोधकांसाठीही औत्सुक्याचा विषय ठरत आहे. नेमकी ही जागा कोणी आणि इथं काय होतं सविस्तर जाणून घेऊयात...

जगात अशी एक जागा आहे जिथे जवळपास 75 हजार साप एकाच वेळी जमतात आणि स्वत:साठी जोडीदाराचा शोध घेतात. बरं सापांचं हे मिलन पाहण्यासाठी इथं हजारो पर्यटकही गर्दी करताना दिसतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या जागेला सापांचा ‘हनिमून स्पॉट’ अशा नावानेही ओळखलं जातं. या शहरामध्ये वळवळणारे साप दिसणं अतिशय सामान्य बाब आहे. हे शहर कॅनडामधील मॅनिटोबा येथे असून त्याचं नाव, नार्सिस सिटी असं आहे. दर वसंत ऋतूला या शहरामध्ये 75 हजारांहून अधिक साप एकाच ठिकाणी जमतात. कधी कधी सापांची ही संख्या 75 हजारांच्या दुप्पट म्हणजेच दीड लाखांपर्यंतही जाते. या सापांच्या शरीरावर लाल रंगाची पट्टी असते आणि हे सर्व साप पूर्वी गार्टर प्रजातीचे असतात. जीवशास्त्राशी संबंधित तज्ज्ञ मंडळी दरवर्षी मार्च ते जूनदरम्यान हजारोंच्या संख्येनं या शहराला भेट देतात. संपूर्ण हिवाळा आपल्या बिळांमध्ये लपून घालवल्यानंतर हे साप जमिनीमधील कपार्‍यांमधून बाहेर येतात. उष्ण वातावरणाचा आनंद घेण्याबरोबरच ते प्रजनन करण्यासाठी जोडीदाराच्या शोधात असतात. या शोधादरम्यान हजारो साप नार्सिस शहरामध्ये जमतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news