Aurora in Sunlight | ‘स्माईल’ अंतराळयानाने टिपला चक्क सूर्यप्रकाशातील ‘ऑरोरा’!

Aurora in Sunlight |
Aurora in Sunlight | ‘स्माईल’ अंतराळयानाने टिपला चक्क सूर्यप्रकाशातील ‘ऑरोरा’!
Published on: 
Updated on: 

लंडन : पृथ्वीच्या ध्रुवीय भागात निर्माण होणारा ‘ऑरोरा’ म्हणजेच रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा खेळ अतिशय मनोरम असतो; मात्र हा प्रकाश दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाशात दिसेल याची कुणी कल्पना करणार नाही. युरोपियन अंतराळ संस्था (ESA) आणि चिनी विज्ञान अकादमी (CAS) यांच्या संयुक्त ‘स्माईल’ (SMILE - Solar Wind Magnetosphere Ionosphere Link Explorer) या अंतराळ मोहिमेने पृथ्वीचे काही अत्यंत अनोखे आणि मनमोहक फोटो टिपले आहेत. या फोटोंमध्ये पृथ्वीच्या ध्रुवीय भागात चक्क दिवसाच्या सूर्यप्रकाशात चमकणारा ध्रुवीय ऑरोरा स्पष्टपणे दिसून येत आहेत.

साधारणपणे, ध्रुवीय प्रदेशात (उदा. उत्तर किंवा दक्षिण ध्रुव) दिसणारा नयनरम्य ‘ध्रुवीय प्रकाश’ हा रात्रीच्या अंधारातच मानवी डोळ्यांना स्पष्ट दिसतो. कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशात हा प्रकाश दिसेनासा होतो. मात्र, ‘स्माईल’ अंतराळयानावर असलेल्या अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग (Ultraviolet Imager - UVI) कॅमेऱ्यामुळे हा चमत्कार घडला आहे. या विशेष अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानामुळे सूर्याच्या लख्ख प्रकाशातही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात आणि वरच्या वातावरणात घडणाऱ्या या नैसर्गिक प्रकाशाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

सौर वाऱ्यांचा अभ्यास : सूर्याकडून सतत येणारे प्रखर सौरकण जेव्हा पृथ्वीच्या संरक्षक कवच असलेल्या ‘चुंबकीय क्षेत्राशी’ आदळतात, तेव्हा काय घडते याचा अभ्यास करणे. अंतराळ हवामानाचा अंदाज : सौर वादळांचा पृथ्वीवरील उपग्रह, पॉवर ग्रिड आणि दळणवळण यंत्रणांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ही चित्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर या चित्रांमुळे शास्त्रज्ञांना आता केवळ रात्रीच नव्हे, तर २४ तास पृथ्वीच्या ध्रुवीय प्रकाशावर आणि अंतराळ हवामानावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news