स्मार्टफोनचे चार्जिंग अशा पद्धतीने करा...

स्मार्टफोन चार्ज करण्याची योग्य पद्धत नेमकी कशी आहे ते जाणून घेवू
Smartphone charging
स्मार्टफोन चार्जिंगPudhari File Photo
Published on
Updated on

स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ काम करत राहण्यासाठी ती योग्य प्रकारे चार्ज करणे खूप गरजेचे आहे. अयोग्य चार्जिंगमुळे बॅटरी खराब होऊ शकते. तसेच फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. स्मार्टफोन चार्ज करण्याची योग्य पद्धत नेमकी कशी आहे पाहू या :

  • ओरिजिनल चार्जरचा वापर करा. नेहमी आपल्यासोबत फोनचे ओरिजिनल चार्जर ठेवा. दुसरे चार्जर वापरल्यामुळे बॅटरीचे नुकसान होते.

  • स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. जेव्हा बॅटरी 20% च्या खाली जाते, तेव्हा ती चार्ज करणे सुरू करा आणि 80% चार्ज झाल्यावर ती काढून टाका.

  • एकदा फोन पूर्णपणे चार्ज झाला की चार्जरमधून काढून टाका. फोन चार्जरला जास्त वेळ जोडून ठेवल्याने बॅटरी खराब होऊ शकते.

  • खूप गरम किंवा खूप थंड ठिकाणी स्मार्टफोन चार्ज करू नका. उष्णता किंवा थंडीमुळे बॅटरी खराब होऊ शकते.

  • जलद चार्जिंग दीर्घकाळासाठी बॅटरीचे नुकसान करू शकते. म्हणून, ते जपून वापरा.

  • अनेक स्मार्टफोन्समध्ये बॅटरी सेव्हर मोडची सुविधा असते. हा मोड चालू करून तुम्ही बॅटरीचे आयुष्य वाढवू शकता.

  • स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये काही बॅटरीशी संबंधित सेटिंग्ज आहेत. जसे की ऑटो-ब्राइटनेस, लो-पॉवर मोड. या सेटिंग्ज योग्यरित्या सेट करून तुम्ही बॅटरीचे आयुष्य सुधारू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news