भारतातील सर्वात स्लो रेल्वे!

slow railway : 46 कि.मी अंतर कापण्यासाठी लागतात 5 तास
slow railway
भारतातील सर्वात स्लो रेल्वे!
Published on
Updated on

उटी : सध्याचा जमाना भन्नाट वेगाचा आहे, जलद गतीने मार्गोत्क्रमणाचा आहे. इथे मिनिटा-मिनिटांची स्पर्धा आहे. मी पुढे की तू पुढे, अशी जीवघेणी स्पर्धा आहे. पण, या युगातही काही रेल्वे अशा आहेत, ज्या आजही अतिशय मंदगतीने धावतात आणि त्यानंतरही त्या रेल्वेनेच काहींना प्रवास करावा लागतो. अशीच एक रेल्वे म्हणजे निलगिरी माऊंटन. ही रेल्वे इतकी हळू आहे की, 46 कि.मी. अंतर कापण्यासाठी तिला 5 तास लागतात. ही ट्रेन निलगिरी टेकड्या, घनदाट जंगले, धबधबे, 16 बोगदे आणि 250 हून अधिक पूल यांच्या सुंदर दर्‍या ओलांडून आपल्या गंतव्यस्थानी पोहोचते.

या ट्रेनचा वेग कमी आहे, तरीही तिकिटांसाठी इथे लोक खूप गर्दी करतात. लोक या ट्रेनची वाट पाहण्यासाठी तासन्तास थांबतात. निलगिरी पर्वतीय रेल्वे ताशी 9 कि.मी. वेगाने धावते. या ट्रेनला 46 कि.मी.चा प्रवास पूर्ण करण्यासाठी 5 तास लागतात. ही देशातील सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा सुमारे 18 पट स्लो आहे. प्रवासाचा वेग कमी असला, तरी या ट्रेनने प्रवास करणे, खूप आनंददायी आहे. पर्वत, जंगले, धबधबे आणि बोगद्यांमधून जाणारी ही ट्रेन निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देते.

तामिळनाडूतील मेट्टुपलयम स्थानकापासून उटीतील उधगमंडलम स्थानकापर्यंत धावणारी निलगिरी माऊंटन एक्स्प्रेस केलर, कुन्नूर, वेलिंग्टन, लव्हडेल आणि ऊटाकामुंड स्थानकांमधून जाते आणि तिच्या गंतव्यस्थानावर पोहोचते. युनेस्कोने या ट्रेनचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. या गाड्या 1899 मध्ये बि—टिश काळात सुरू झाल्या होत्या. जागतिक स्तरावर विचार करता, स्वित्झर्लंडमध्ये धावणारी ट्रेन ग्लेशियर एक्स्प्रेस आहे, जी फक्त नावापुरती एक्स्प्रेस आहे; पण तिचा वेग कासवासारखा आहे. या ट्रेनला 290 किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे 10 तास लागतात. 1930 पासून धावणारी ही ट्रेन सुंदर दर्‍यांमधून जाते. प्रवासादरम्यान ही ट्रेन 90 हून अधिक बोगदे आणि सुमारे 300 पुलांमधून जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news