स्विडनमध्ये शांत झोपेचे ’स्लीप टूरिझम’

'Sleep tourism' for peaceful sleep in Sweden
स्विडनमध्ये शांत झोपेचे ’स्लीप टूरिझम’.Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडनः सात ते आठ तासांची शांत, गाढ झोप तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत गरजेची असते; मात्र सध्याच्या धकाधकीच्या, घाईगडबडीच्या जीवनात अनेकांची झोप उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करणारे तर अनेक लोक आहेत. शांत झोपावे म्हटलं, तरी आजूबाजूच्या कोलाहलाने, जबाबदार्‍यांमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे आता स्विडनसारख्या देशात लोक खास शांत झोपेसाठी अन्य ठिकाणी जात आहेत. हे ‘स्लीप टुरिझम’ तिथे चांगलेच मूळ धरत आहे.

स्विडनमधील एका गावावर निसर्गाने मुक्त हस्ताने हिरवाईची उधळण केली आहे. हे गाव धकाधकीपासून कोसो दूर आहे. या गावाची लोकसंख्या अवघी 65 इतकी आहे. या गावात ‘स्व’चा शोध घेण्यासाठी, शांत आणि गाढ झोपण्यासाठी हजारो पर्यटक येतात. या गावात शांती आहे, निसर्ग आहे. या सान्निध्यात लोकांच्या काळजावर निसर्ग फुंकर घालतो. त्यांना ताजंतवाणं करतो. स्वीडनमध्ये हळूहळू असे स्लीप टुरिझम प्रचलित होत आहे. स्वीडिश द्वीप समूहातील काही गावात केवळ झोपण्यासाठी लोक येतात. येथे आल्यावर आयुष्यभराचा थकवा ते घालवतात. स्वीडनमध्ये आलिशान आणि नैसर्गिक वातावरणात शांत झोपेची ही संकल्पना रूजू लागली आहे. निसर्गाच्या कुशीत पहुडण्याची संधी शोधत अनेक पर्यटक येथे येत आहेत. साधारण खोली, आरामदायक बिछाना, एक खुर्ची, टेबल, उघडी खिडकी आणि समोर भव्य असा निसर्ग असे वातावरण पर्यटकांना खुणावत आहे. येथे ना टीव्ही, ना इंटरनेट. केवळ शांती, निसर्ग आणि तुमची झोप याशिवाय चौथं कोणी नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news