Six Planet Parade | ‘या’ महिन्यात दिसणार सहा ग्रहांची ‘परेड’!

Six Planet Parade
Six Planet Parade | ‘या’ महिन्यात दिसणार सहा ग्रहांची ‘परेड’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोलप्रेमींसाठी 2026 चा फेब्रुवारी महिना अत्यंत खास ठरणार आहे. या महिन्यात अंतराळात एकापाठोपाठ एक अनेक रोमांचक घटना घडणार आहेत. यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि सहा ग्रहांची दुर्मीळ ‘प्लॅनेटरी परेड’ पाहायला मिळणार असून, जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे याकडे लक्ष लागले आहे.

17 फेब्रुवारी रोजी अमावास्येच्या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे एक ‘वलयाकार’ किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान येतो, तेव्हा सूर्याचा मधला भाग झाकला जातो; पण कडा उघड्या राहतात. या ग्रहणावेळी चंद्र पृथ्वीपासून त्याच्या कक्षेतील सर्वात दूरच्या बिंदूवर असेल. त्यामुळे तो आकाराने लहान दिसेल आणि सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. नॅशनल जियोग्राफिकच्या अहवालानुसार, चंद्र सूर्याचा 92 टक्के भाग कव्हर करेल, ज्यामुळे आकाशात प्रकाशाचे एक वर्तुळ ‘रिंग ऑफ फायर’ (आगीचे कडे) सारखे दिसेल.

हा नजारा 2 मिनिटे 19 सेकंद टिकेल. हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिकातून दिसेल. दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत ते अंशतः पाहायला मिळेल. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आपल्या सौरमंडलातील ग्रह एका रांगेत येऊन एक शानदार नजारा सादर करतील. 28 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या आकाशात सहा ग्रह एकाच वेळी पाहता येतील. गुरू, युरेनस, नेपच्यून, बुध, शनी आणि शुक्र हे सहा ग्रह सूर्यास्तानंतर एका सरळ रेषेत दिसतील. हा नजारा अमेरिका, कॅनडा, युरोपसोबतच भारतातही पाहायला मिळणार आहे. बुध, शुक्र, शनी आणि गुरू हे चार ग्रह कोणत्याही उपकरणाशिवाय साध्या डोळ्यांनी पाहता येतील. मात्र, युरेनस आणि नेपच्यून पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news