High Heels : तासन्‌‍तास ‌‘हाय हील्स‌’ वापरणे ठरू शकते घातक

गुडघे आणि मणक्याच्या आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम
High Heels
High Heels
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजच्या काळात ‌‘हील्स‌’ घालणे हे केवळ फॅशन नसून एक ‌‘स्टाईल स्टेटमेंट‌’ बनले आहे. पार्टी असो किंवा ऑफिस, स्टायलिश लूकसाठी महिला तासन्‌‍तास हाय हील्स परिधान करतात. मात्र, सतत आणि दीर्घकाळ हील्स वापरल्याने आरोग्यावर, विशेषतः गुडघ्यांवर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, रोज आणि जास्त वेळ हील्स घातल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते. यामुळे चालण्याची पद्धत बदलते आणि गुडघ्यांवर अतिरिक्त दाब पडतो. हा दाब वाढल्यामुळे लिगामेंट आणि स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधे आखडण्याच्या समस्या सुरू होतात. सुरुवातीला केवळ हलकी वेदना किंवा ओढ जाणवते; परंतु सततच्या वापरामुळे ही समस्या गंभीर रूप घेऊ शकते. गुडघ्यांच्या सांध्यातील ‌‘कार्टिलेज‌’ची (कूर्चा) झीज होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात ‌‘ऑस्टियो आर्थरायटिस‌’ (संधिवात) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. याव्यतिरिक्त, हील्समुळे पायांचे स्नायू कमकुवत होतात आणि शरीराच्या वजनाचा सर्व भार गुडघ्यांवर येतो. 2 ते 3 इंचांपेक्षा जास्त उंचीच्या हील्समुळे गुडघ्यांवरचा दाब प्रचंड वाढतो. तसेच पेन्सिल हील्स म्हणजेच अतिशय टोकदार हील्समुळे शरीराचे संतुलन राखणे कठीण जाते. टोकदार हील्समुळे पायांच्या नैसर्गिक हालचालींवर मर्यादा येतात, ज्याचा ताण थेट गुडघ्यांवर पडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news