Wildlife breeding rates decline| माणसासोबतच वन्यजीवांच्याही प्रजनन दरात झाली कमालीची घट

Wildlife breeding rates decline|
Wildlife breeding rates decline| माणसासोबतच वन्यजीवांच्याही प्रजनन दरात झाली कमालीची घटDr. SD
Published on
Updated on

लंडन : निसर्गाच्या चक्रात एक अत्यंत भीतिदायक आणि चिंताजनक बदल पाहायला मिळतोय. माणूस असो वा प्राणी, दोघांच्याही प्रजनन क्षमतेमध्ये वेगाने घट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात पृथ्वीवर नवीन जीव जन्माला येणे दुरापास्त होईल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दशकांपासून जगभरातील मानवी लोकसंख्या आणि वन्यजीवांच्या प्रजनन दरात कमालीची घट झाली आहे. याला शास्त्रज्ञ ‘सायलेंट फर्टिलिटी डिक्लाईन’ असे म्हणत आहेत. हे संकट अचानक आलेले नाही, तर ते हळूहळू पण निश्चितपणे सजीव सृष्टीचा पाया पोखरत आहे. विशेषतः पुरुषांमधील स्पर्म काऊंट (शुक्राणूंची संख्या) आणि महिलांमधील स्त्रीबीजांची गुणवत्ता खालावत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही समस्या केवळ शहरांपुरती मर्यादित नसून जंगलातील प्राण्यांमध्येही दिसून येत आहे. या विनाशामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ‘एंडोक्राइन डिस्रप्टिंग केमिकल्स’ ( EDCs)). आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या प्लास्टिक, कीटकनाशके आणि औद्योगिक रसायनांमधून ही घातक द्रव्ये आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत.

ही रसायने शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची नक्कल करतात आणि प्रजनन संस्थेच्या कार्यात अडथळा आणतात. यामुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. केवळ मानवच नाही, तर निसर्गातील इतर घटकही यातून सुटलेले नाहीत. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि जमिनीवरील सस्तन प्राण्यांमध्ये लिंगबदल होणे किंवा त्यांची प्रजनन क्षमता नष्ट होणे अशा घटना वाढल्या आहेत. प्रदूषित नद्यांमधील माशांच्या प्रजनन अवयवांमध्ये विकृती आढळली आहे. जर अन्नसाखळीतील हे प्राणी नष्ट झाले, तर संपूर्ण परिसंस्थेचा समतोल बिघडून मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. आजची धावपळीची जीवनशैली, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे देखील या समस्येला खतपाणी घालत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news