Portugal coast giant waves | पोर्तुगालच्या किनार्‍यावर 7 मजली उंच लाटांचा थरार

Portugal coast giant waves
Portugal coast giant waves | पोर्तुगालच्या किनार्‍यावर 7 मजली उंच लाटांचा थरारFile photo
Published on
Updated on

नाझरे (पोर्तुगाल) : नुकत्याच समोर आलेल्या एका उपग्रह छायाचित्राने पोर्तुगालच्या किनारपट्टीवरील निसर्गाचे रौद्ररूप जगासमोर आणले आहे. या चित्रात 7 मजली इमारतीइतक्या उंच लाटा समुद्रात उसळताना दिसत असून, या प्रचंड शक्तीमुळे समुद्राच्या तळातील वाळू आणि गाळाचे ढग अवकाशातून स्पष्टपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी हे छायाचित्र टिपले गेले, त्याच दिवशी एका 18 वर्षीय स्थानिक सर्फरने या अजस्र लाटांवर स्वार होऊन नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.

‘लँडसॅट 8’ या उपग्रहाने पश्चिम पोर्तुगालमधील ‘नाझरे’ शहराजवळचे हे द़ृश्य टिपले आहे. नाझरे हे शहर जगातील सर्वात उंच लाटांसाठी ओळखले जाते. या भागात उसळलेल्या लाटांची उंची साधारणपणे 80 फूट (24 मीटर) इतकी होती, जी एका 7 मजली इमारतीच्या उंचीएवढी आहे. या लाटा इतक्या शक्तिशाली होत्या की त्यांनी समुद्राच्या तळातील वाळू उपसून ती विरुद्ध दिशेला फेकली, ज्यामुळे समुद्राच्या पाण्यात 10 किलोमीटरपर्यंत लांब गाळाचे लोट पसरले होते. नासाच्या ‘अर्थ ऑब्झर्व्हेटरी’ने ही माहिती दिली आहे.

याच रौद्र लाटांच्या दरम्यान, स्थानिक सर्फर अँटोनियो लॉरेनो याने सुमारे 101.4 फूट (30.9 मीटर) उंच लाटेवर सर्फिंग करण्याचा धाडसी पराक्रम केला. मानवी इतिहासात आजवर सर्फिंग केलेली ही सर्वात उंच लाट मानली जात आहे. हा विक्रम ‘वर्ल्ड सर्फ लीग’द्वारे अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आलेला नाही, कारण त्यांच्या प्रतिनिधींनी लाटेची उंची मोजली नव्हती. मात्र, लिस्बन विद्यापीठातील समुद्रशास्त्रज्ञांनी व्हिडीओचे विश्लेषण करून ही उंची 101.4 फूट असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुमारे 15,000 लोकसंख्या असलेल्या नाझरे शहरात दरवर्षी ‘बिग-वेव्ह’ सर्फिंग स्पर्धांचे आयोजन केले जाते. येथील लाटा इतक्या वेगवान आणि उंच असतात की सर्फरना जेट स्कीच्या मदतीने लाटेच्या मध्यभागी सोडावे लागते. या काळात लाटांची उंची 50 फुटांपर्यंत असते; परंतु यंदाच्या 80 ते 100 फुटी लाटा अत्यंत धोकादायक श्रेणीतील होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news