Safety pin design: सेफ्टी पिनमधील त्या छोट्या छिद्राचे रहस्य माहितीये का?

सेफ्टी पिनला खालच्या बाजूला तार गोल फिरवून एक ‌‘कॉईल‌’ तयार केलेली असते. हेच छिद्र स्प्रिंगसारखे काम करते
Safety pin design
Safety pin design: सेफ्टी पिनमधील त्या छोट्या छिद्राचे रहस्य माहितीये का?File Photo
Published on
Updated on

मुंबई : कपडे जोडण्यापासून ते अगदी आपत्कालीन जुगाडापर्यंत, प्रत्येक घरात हमखास आढळणारी वस्तू म्हणजे ‌‘सेफ्टी पिन‌’. आपण सर्वांनीच ती वापरली आहे; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, सेफ्टी पिनच्या खालच्या बाजूला एक छोटेसे गोल छिद्र का असते? हे छिद्र केवळ डिझाईनचा भाग नसून, त्यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारण दडलेले आहे.

सेफ्टी पिनला खालच्या बाजूला तार गोल फिरवून एक ‌‘कॉईल‌’ तयार केलेली असते. हेच छिद्र स्प्रिंगसारखे काम करते. या स्प्रिंगमुळे पिनच्या टोकाला योग्य अँगल आणि ताण मिळतो. हा ताणच पिनच्या अणकुचीदार टोकाला लॉकच्या आत घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतो. जर हे छिद्र किंवा स्प्रिंग नसेल, तर पिन वारंवार उघडली जाईल, कपड्यांवरील पकड सैल होईल आणि टोचून इजा होण्याची भीती वाढेल. म्हणूनच, हे छोटे छिद्र पिनला सुरक्षित आणि मजबूत बनवते. सेफ्टी पिनचा वापर काही आजचा नाही. प्राचीन काळी लॅटिन भाषेत याला ‌‘फिबुला‌’ म्हटले जाई.

असे मानले जाते की, कांस्य युगात युरोपमध्ये कपडे शरीरावर टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर सुरू झाला होता. मात्र, त्या काळातील पिन्सची रचना आजच्यापेक्षा वेगळी आणि गुंतागुंतीची होती. आज आपण जी स्प्रिंगवाली सेफ्टी पिन वापरतो, तिचा शोध 1849 मध्ये वॉल्टर हंट यांनी लावला. त्यांनी एकाच तारेला अशा प्रकारे वळवले की, त्यातून स्प्रिंग मेकॅनिझम तयार झाले. यापूर्वी उत्तर युरोपमध्ये दोन वेगवेगळ्या भागांपासून पिन बनवली जात असे, ज्यामध्ये स्प्रिंग नसायचे. हंट यांच्या डिझाईनमुळे पिन वापरणे सोपे आणि सुरक्षित झाले.

उत्तर युरोपात पिनमध्ये स्प्रिंग नसायचे, फक्त एका छिद्रात दुसरे टोक अडकवले जाई. मध्य युरोप आणि ग््राीसमध्ये एकाच तारेपासून पिन बनवली जाई, जी आजच्या पिनशी मिळतीजुळती होती. वॉल्टर हंट यांनी या जुन्या डिझाईन्समध्ये सुधारणा करून आधुनिक सेफ्टी पिन जगासमोर आणली. आज ती आपल्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग बनली आहे की, त्यातील ‌‘स्मार्ट इंजिनिअरिंग‌’कडे आपले लक्षही जात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news