Pregnancy Research | गर्भधारणेतील स्त्रीबीज निर्मितीचे रहस्य उलगडले

secret-of-egg-formation-in-pregnancy-revealed
Pregnancy Research | गर्भधारणेतील स्त्रीबीज निर्मितीचे रहस्य उलगडले Pudhari File Photo
Published on
Updated on

लॉस एंजेलिस : मानवी अंडाशयात (ovaries) आयुष्यभरासाठी लागणार्‍या स्त्रीबीजांची (egg cells) निर्मिती कशी होते, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ एक पाऊल पुढे गेले आहेत. अंडाशयातील स्त्रीबीजांचा साठा (ovarian reserve) कसा तयार होतो, यावर नवीन संशोधन करण्यात आले असून हे संशोधन 26 ऑगस्ट रोजी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

या संशोधनामध्ये माकडांमध्ये गर्भधारणेच्या सुरुवातीपासून ते जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत अंडाशयाचा विकास कसा होतो, याचा अभ्यास करण्यात आला. यात पेशी आणि रेणूंचा उदय आणि प्रगती यांचा नकाशा तयार करण्यात आला, जे पुढे अंडाशयातील साठ्याचे रूप घेतात. या अभ्यासाचे सहलेखक आणि यूसीएलए (UCLA) मधील विकासात्मक जीवशास्त्रज्ञ अमांडर क्लार्क यांनी सांगितले की, हा नकाशा ‘अज्ञात जीवशास्त्रातील’ काही महत्त्वपूर्ण जागा भरून काढतो.

क्लार्क यांच्या मते, या नकाशामुळे आता संशोधक प्रयोगशाळेत अंडाशयाची अधिक चांगली मॉडेल्स तयार करू शकतात. यामुळे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या प्रजनन संबंधित रोगांचा अभ्यास करणे शक्य होईल. पीसीओएस हा एक जटिल हार्मोनल विकार आहे, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते. अंडाशये ही महिलांची प्राथमिक प्रजनन अवयव आहेत. त्यांची महिलांच्या आरोग्यात आणि प्रजननात दोन महत्त्वाची कार्ये आहेत : स्त्रीबीजांची निर्मिती करणे आणि इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनसारख्या लैंगिक हार्मोन्सची निर्मिती करणे.

अंडाशयाचा विकास गर्भधारणेनंतर सुमारे सहा आठवड्यांनी सुरू होतो. सुरुवातीच्या टप्प्यात, जर्म पेशी (germ cells) - ज्यांचे रूपांतर स्त्रीबीजांमध्ये होते - त्या विभाजित होतात आणि एकमेकांशी जोडल्या जाऊन ‘नेस्टस्’ (nests) नावाच्या जटिल साखळ्या तयार करतात. जेव्हा ही नेस्टस् फुटतात, तेव्हा स्वतंत्र स्त्रीबीजे बाहेर पडतात. ही स्त्रीबीजे नंतर प्रिग्रॅन्युलोसा पेशीं (pregranulosa cells) च्या एका थराने वेढली जातात. या पेशी तरुण स्त्रीबीजांना आधार देतात आणि योग्य वेळी परिपक्व होण्यासाठी संकेत देतात. या प्रिग्रॅन्युलोसा पेशींनी वेढलेल्या स्त्रीबीजांना आदिम फॉलिकल्स (primordial follicles) म्हणतात आणि याच फॉलिकल्सनी अंडाशयातील साठा (ovarian reserve) बनलेला असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news