शास्त्रज्ञांनी प्रथमच प्रत्यक्ष पाहिले पाण्याचे विभाजन

water splitting : ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध
water splitting
पाण्याचे विभाजन
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः प्रथमच, शास्त्रज्ञांनी पाण्याचे रेणू प्रत्यक्षरित्या विभागले जाताना पाहिले आणि त्यातून हायड्रोजन व ऑक्सिजन तयार होत असल्याचे निरीक्षण केले. विशेष म्हणजे, विभाजित होण्याच्या अगोदर, हे रेणू काहीसं अनपेक्षित वर्तन करत 180 अंशांनी उलटे वळले. ही सूक्ष्म ‘अ‍ॅक्रोबॅटिक’ हालचाल ऊर्जेची मागणी करते, ज्यामुळे पाणी विभाजित करण्यासाठी आवश्यक ऊर्जेचे प्रमाण पूर्वीच्या सैद्धांतिक गणनांपेक्षा अधिक का आहे, याचे स्पष्टीकरण मिळते. या संशोधनातून हायड्रोजन इंधन अधिक कार्यक्षम आणि स्वस्त कसे बनवता येईल, यावर महत्त्वाची माहिती मिळू शकते. तसेच, भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी शुद्ध ऑक्सिजन मिळवण्याचा मार्गही यातून उघडू शकतो.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले. हायड्रोजन हा एक शक्तिशाली आणि पर्यावरणपूरक इंधन स्रोत आहे. ट्रक आणि कार्गो जहाजे यांना ऊर्जादायक करण्यापासून ते पोलाद आणि खत उद्योगातही त्याचा उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हायड्रोजन जळल्यानंतर कार्बन डायऑक्साइडच्या ऐवजी पाणी तयार होते, त्यामुळे तो प्रदूषणमुक्त पर्याय आहे. हायड्रोजन इंधन मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यासाठी आवश्यक ऊर्जा सध्या खूपच जास्त आहे, त्यामुळे त्याचा वापर मर्यादित आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (खएअ) अहवालानुसार, दरवर्षी 322 दशलक्ष टन हायड्रोजन इंधनाची गरज आहे; पण 2023 मध्ये फक्त 97 दशलक्ष टन उत्पादन झाले. याशिवाय, हायड्रोजनचे उत्पादन साधारणतः सेंद्रिय इंधनांपेक्षा 1.5 ते 6 पट अधिक खर्चिक आहे आणि त्यातील बहुतेक उत्पादन हे अजूनही जीवाश्म इंधनांचा वापर करूनच केले जाते. या नवीन संशोधनामुळे पाणी विभागणी अधिक कार्यक्षम करण्याच्या दिशेने नवी दालने खुली होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात हायड्रोजन इंधन स्वस्त आणि सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news