

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना अवकाशात चार ‘बाळ’ (Baby Planets) ग््राहांचे दुर्मीळ दर्शन झाले आहे. या ग््राहांच्या निरीक्षणातून एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे : हे ग््राह जसजसे जुने होत आहेत, तसतसे त्यांचे वजन कमी होत आहे. शास्त्रज्ञांनी या ग््राहांची तुलना ‘थर्माकोल’च्या हलक्या वजनाशी केली आहे.
हे चार ग््राह v1298 Tau नावाच्या ताऱ्याभोवती फिरत आहेत. हा तारा पृथ्वीपासून सुमारे 350 प्रकाशवर्षे दूर असून तो केवळ 2 कोटी वर्षे जुना आहे. आपल्या सूर्याच्या (साडेचार अब्ज वर्षे) तुलनेत ही ताराप्रणाली अतिशय तरुण आहे. गेल्या 10 वर्षांच्या निरीक्षणांनंतर असे दिसून आले की, या ग््राहांची घनता अत्यंत कमी आहे आणि ते एखाद्या फुग्यासारखे फुगलेले आहेत. हे संशोधन ग््राहांच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील आणि पूर्ण विकसित झालेल्या ग््राहांच्या मधला ‘गहाळ दुवा’ मानले जात आहे. यातील एक ग््राह गुरू ग््राहाच्या आकाराचा आहे, तर इतर तीन ग््राह नेपच्यून आणि शनीच्या दरम्यानच्या आकाराचे आहेत.
संशोधकांच्या मते, जसजसे हे ग््राह जुने होतील, तसतसे त्यांचे दाट वातावरण नष्ट होईल. यामुळे ते भविष्यात आकुंचन पावून ‘सुपर-अर्थ’ किंवा ‘सब-नेपच्यून’मध्ये रूपांतरित होतील. जपानच्या नॅशनल ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीमधील सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जॉन लिव्हिंगस्टन म्हणाले, ‘आम्हाला एका सामान्य ग््राह मालिकेचे बालपण इतक्या स्पष्टपणे पाहता येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यात हे ग््राह नेमके कसे असतील, याची झलक आम्हाला मिळाली आहे.’ या ग््राहांचा शोध 2019 मध्ये नासाच्या केपलर अंतराळ दुर्बिणीद्वारे लावण्यात आला होता. 7 जानेवारी रोजी ‘नेचर’ या प्रसिद्ध मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. आतापर्यंतच्या 500 हून अधिक ग््राह मालिकांपैकी केवळ एकाच ठिकाणी (केपलर-51) अशा प्रकारची ग््राहांची रचना पाहायला मिळाली होती.