Sixth Dwarf Planet | प्लूटोच्या पलीकडे सूर्यमालेतील सहाव्या बटू ग्रहाचे अस्तित्व शक्य

व्हेरा सी. रुबिन वेधशाळेचा शोध
Sixth Dwarf Planet |
Sixth Dwarf Planet | प्लूटोच्या पलीकडे सूर्यमालेतील सहाव्या बटू ग्रहाचे अस्तित्व शक्य
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : सूर्यमालेच्या अत्यंत दूरच्या आणि गूढ प्रदेशात, नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे व्हेरा सी. रुबिन वेधशाळेला एका नव्या आणि लहानशा जगात लपलेल्या खगोलीय वस्तूचा शोध लागला आहे. नेपच्यूनपलीकडे आजवर शोधल्या गेलेल्या सर्वात मोठ्या आणि तेजस्वी वस्तूंपैकी ही एक आहे. जर याच्या अस्तित्वाला अधिकृत दुजोरा मिळाला, तर आपल्या सूर्यमालेतील अधिकृत बटू ग्रहांची (dwarf planets) संख्या वाढून सहा होईल. या वस्तूच्या आकाराच्या उच्च अंदाजांनुसार, हा नवीन खगोलीय गोल सर्वात मोठा ज्ञात बटू ग्रह असलेल्या ‘प्लूटो’च्या व्यासाच्या निम्म्याहून अधिक मोठा असू शकतो.

या संभाव्य बटू ग्रहाचा शोध लावण्यास मदत करणारे स्मिथ्सोनियन अ‍ॅस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हटरीचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि रुबिन टीमचे सदस्य मॅथ्यू होल्मन यांनी एका निवेदनात म्हटले, ‘माझी पहिली प्रतिक्रिया उत्साही; पण अविश्वासाची होती. अशा खगोलीय वस्तू अत्यंत दुर्मीळ असतात, त्यामुळे माझ्याकडून किंवा कोडकडून काही चूक झाली आहे का, हे मी तत्काळ तपासू लागलो.’ ‘2026 ED138’ असे सांकेतिक नाव दिलेला हा संभाव्य बटू ग्रह सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतराच्या साधारणत: ४६ पट अंतरावर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालात आहे. हा नवीन ग्रहासारखा खगोलीय गोल ‘गॅलॅक्टिक कॅमोफ्लाझ’ (आकाशगंगेचे लपण्याचे तंत्र) मुळे आतापर्यंत लपून राहिला होता. सूर्यमालेच्या प्रतलापासून २५ अंशांच्या कोनात त्याची कक्षा झुकलेली असून, आकाशगंगेच्या आतील भागातील प्रकाशामध्ये लपून जाण्यासाठी हा योग्य कोन असल्याचे संशोधकांनी सांगितले.

आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या दशलक्षोधी ताऱ्यांच्या पलीकडे पाहताना अनेक दुर्बिणींना अडचणी येतात. मात्र, आजवर बनवलेल्या सर्वात मोठ्या डिजिटल कॅमेऱ्याच्या साहाय्याने व्हेरा सी. रुबिन वेधशाळा दर काही रात्रींनी संपूर्ण दक्षिण आकाशाचे छायाचित्रण करते. याद्वारे चमक किंवा स्थान बदलणाऱ्या प्रत्येक वस्तूची दररोज दशलक्षावधी चेतावणी (alerts) पाठवली जाते. यामुळे सूर्यमालेतील वस्तू असोत वा सुपरनोव्हा स्फोटांसारख्या क्षुद्र घटना, हलणाऱ्या प्रत्येक घटकाची ओळख पटवण्यात ही वेधशाळा अत्यंत यशस्वी ठरली आहे. या वेधशाळेने जुलैमध्येच आकाशाचे सर्वेक्षण करण्याची आपली १० वर्षांची मोहीम सुरू केली होती आणि या प्रक्रियेत ‘ED138’ने डेटामधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.