तब्बल शंभर इंचांची पारदर्शक, किफायतशीर टीव्ही स्क्रीन

दक्षिण कोरियातील संशोधकांनी बनवली मोठ्या आकार, स्वस्त पारदर्शक स्क्रीन
Scientists develop a cost-effective 100-inch transparent screen
Pudhari File Photo

सेऊल : दक्षिण कोरियातील संशोधकांनी मोठ्या आकाराची व स्वस्त अशी पारदर्शक स्क्रीन बनवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात ट्रान्सपरंट टीव्हीसाठी म्हणजेच पारदर्शक टीव्हीसाठी अधिक किफायतशीर स्क्रीन उपलब्ध होऊ शकते. एका नव्या प्रकारच्या फिल्म मटेरियलपासून संशोधकांनी ही शंभर इंची नॅनो ट्रान्सपरंट स्क्रीन (एनटीएस) बनवली आहे. ती मानवी केसाइतक्या जाडीची असून ती रंग व प्रकाशाच्या अत्युच्च गुणवत्तेसह अधिक तपशीलासह इमेज दाखवू शकण्यास सक्षम आहे.

भविष्यातील नव्या पारदर्शक व स्वस्त स्क्रीनचा लाभ

या स्क्रीनच्या हलक्या आणि लवचिक वैशिष्ट्याबरोबरच त्याची पारदर्शकताही नियंत्रित करता येऊ शकते हे विशेष. अतिशय सूक्ष्म तपशीलही या स्क्रीनवर स्पष्ट पाहता येऊ शकतील. टार्गेटेड लाईटसाठीही ती अतिशय मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्टिव्ह आहे. त्यामुळे एखाद्या पॉवरफुल प्रोजेक्टरमधून निघालेली बीम त्यावर धडकली की ती अत्यंत स्पष्ट प्रतिमा निर्माण करू शकते. तिच्यामध्ये 170 अंशाचा व्ह्युईंग अँगलही आहे. कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ मशिनरी अँड मटेरियल्स (केआयएमएम) मधील संशोधकांनी ‘मेटा पिपल’ या खासगी कंपनीच्या सहकार्याने या स्क्रीनचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. या स्क्रीनसाठीच्या फिल्मची शिट टायटॅनियम डायऑक्साईडच्या सूक्ष्म कणांनी युक्त आहे. हे नॅनोपार्टिकल्स ‘एनटीएस’ला अधिक काळ टिकण्याची आणि फिल्मची ऑप्टिक क्वॉलिटी सुधारण्याची क्षमता देते. याचा अर्थ त्यावर प्रोजेक्ट केलेल्या इमेज अतिशय स्वच्छ, स्पष्ट दिसतात. या फिल्मवर एका विशिष्ट अशा क्रिस्टल पॉलिमरचाही स्तर आहे. भविष्यातील पारदर्शक टीव्हीला या नव्या पारदर्शक व स्वस्त स्क्रीनचा लाभ मिळू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news