Largest 3D map of universe | ब्रह्मांडाचा सर्वात मोठा आणि स्पष्ट थ्रीडी नकाशा तयार

डार्क एनर्जीचे रहस्य आता सुटणार?
Largest 3D map of universe |
Largest 3D map of universe | ब्रह्मांडाचा सर्वात मोठा आणि स्पष्ट थ्रीडी नकाशा तयार
Published on
Updated on

अ‍ॅरिझोना : खगोलशास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि उच्च रिझोल्यूशन असलेला त्रिमितीय (थ्रीडी) नकाशा तयार करण्यात यश मिळवले आहे. या नकाशात 4 कोटी 70 लाखांहून अधिक आकाशगंगा आणि महाकाय खगोलीय वस्तूंचा समावेश असून, यामुळे विश्वातील सर्वात मोठे कोडे असलेल्या ‘डार्क एनर्जी’चे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.

‘डार्क एनर्जी’ ही संपूर्ण विश्वात पसरलेली एक अनाकलनीय शक्ती आहे, जी विश्वाच्या विस्ताराचा वेग वाढवत आहे. ती नेमकी काय आहे, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, ही शक्ती अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांतात मांडलेला ‘कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट’ असू शकते, जो रिक्त अवकाशातील ऊर्जेची घनता दर्शवतो; मात्र नवीन नकाशा या कल्पनेला आव्हान देऊ शकतो. हा नकाशा डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रूमेंटच्या साहाय्याने तयार करण्यात आला आहे. हे उपकरण अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना येथील दुर्बिणीवर बसवण्यात आले असून, गेल्या पाच वर्षांपासून ते रात्रीच्या आकाशाचे सर्वेक्षण करत आहे.

या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व अमेरिकेच्या ऊर्जा विभागाची ‘लॉरेन्स बर्केले नॅशनल लॅबोरेटरी’ करत आहे. या नकाशात मागील सर्व सर्वेक्षणांच्या तुलनेत सहा पट जास्त आकाशगंगांची नोंद करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, डार्क एनर्जीचा प्रभाव काळानुसार बदलू शकतो, असे संकेत मिळाले आहेत. हे सिद्ध झाले, तर विश्वाच्या स्वरूपाबद्दलचे आपले मूलभूत समज बदलू शकतात.‘हा नकाशा केवळ विज्ञानासाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीला आपले विश्व आणि त्याचे भवितव्य समजून घेण्यासाठी आहे,’ असे छजखठङरल च्या खगोलशास्त्रज्ञ स्टॅफनी जुनो यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news