विज्ञान म्हणते ‘ही’ आहे जगात सर्वात सुंदर

 beautiful woman in the world
विज्ञान म्हणते ‘ही’ आहे जगात सर्वात सुंदर
Published on
Updated on

लंडन ः अमेरिकेची अभिनेत्री एम्बर हर्डचे जगभरात लाखो चाहते आहेत. एम्बरने 2004 मध्ये ‘फ्रायडे नाईट लाइटस्’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. जॉनी डेपशी घटस्फोट आणि कारवाईनंतर ती चर्चेत आली होती. त्यावेळी नवरा जॉनी डेप विरोधात असलेला हा खटला ती जिंकू शकली नाही. नवर्‍यासोबतचा हा खटला हरल्यानंतर तिने सोशल मीडियापासून स्वत: ला लांब केले आहे. त्यानंतर ती आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. अशा या एम्बरला सौंदर्याच्या वैज्ञानिक मापदंडाने जगातील सर्वात सुंदर महिला ठरवले आहे!

एम्बर हर्ड ही जगातील सगळ्यात सुंदर महिला कशी काय ठरली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याविषयी जाणून घेऊया. ‘गोल्डन रेशो फिजिकल परफेक्शन’चा सगळ्यात चांगला आणि परफेक्ट चेहरा शोधण्याची एक पद्धत आहे. या तंत्रामध्ये डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी यासारख्या पॉईंटस्ला मार्क करण्यात येते. त्यानंतर पुन्हा कॉप्युटरमध्ये फीड केल्यानंतर त्याच्या आधारावर मॅपिंग करण्यात येते. सुंदरता कशी मोजतात असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर विज्ञानात त्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीला ‘फेशियल मॅपिंग टेक्निक’ म्हणतात. त्यात काही गोष्टी ठरलेल्या आहेत. ज्यावरून सुंदरता मोजतात. चेहर्‍याच्या सुंदरतेला मोजण्यासाठी ‘ग्रीक गोल्डेन रेशो’चा वापर करण्यात येतो. कोणत्या व्यक्तीच्या चेहर्‍याची सुंदरता मोजण्यासाठी चेहरा किती लांब आणि रुंद आहे ते पाहतात. सगळ्यात असलेले अंतर म्हणजे कानाची लांबी ही नाकाच्या लांबीच्या बरोबर असली पाहिजे. डोळ्यांची रूंदी व डोळ्यांच्यामध्ये असलेले अंतर हे एकसारखे असायला हवे. हर्ले स्ट्रीटची सर्जन डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी याविषयी सांगितले की, हा रिसर्च मी गोल्डन रेशोच्या आधारावरून केला आहे. यात सगळ्यात जास्त 91.85 टक्के एम्बर हर्डचे डोळे, भुवया, नाक, ओठ, हनुवटी, जबडा, चेहर्‍याचा आकार, गोल्डन रेशोच्या जवळ आहे. ’ State of The Art Face Mapping Data’ च्या म्हणण्याप्रमाणे एम्बर हर्डचा चेहरा जगातील सगळ्यात सुंदर चेहरा आहे. एम्बर हर्डचा चेहरा 91.85 टक्के ‘अ‍ॅक्युरेट’ आहे. हा शोध बि—टिशच्या सर्जनने लावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news