Air travel : विमान प्रवासात वेळेचे गणित बिघडल्याने का होतो प्रवाशांना ‘जेट लॅग‌’?

दिवसा थकवा, रात्री अनिद्रा, नैराश्याचा धोका
Air travel
विमान प्रवासात वेळेचे गणित बिघडल्याने का होतो प्रवाशांना ‘जेट लॅग‌’?
Published on
Updated on

लंडन : लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो. दिवसा प्रचंड थकवा जाणवणे आणि रात्री झोपण्यासाठी संघर्ष करावा लागणे. वैद्यकीय भाषेत याला ‌‘जेट लॅग‌’ असं म्हणतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना जेव्हा आपण अनेक टाईम झोन ओलांडतो, तेव्हा हा त्रास जाणवतो.

बहुतेक लोकांना पश्चिमेकडून पूर्वेकडे विमान प्रवास करताना जेट लॅगचा त्रास जास्त होतो. याचं कारण म्हणजे, आपल्या शरीराचे अंतर्गत घड्याळ (बॉडी क्लॉक) हे 24 तासांपेक्षा थोडे जास्त असते. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या स्लीप अँड सर्केडियन रिसर्च लॅबोरेटरीच्या प्राध्यापिका हेलन बर्गेस सांगतात, “आपल्या शरीराच्या घड्याळाला पुढे नेणे सोपे असते; पण पूर्वेकडे जाताना वेळ मागे सरकते. त्यामुळे शरीराला त्या वेळेची जुळवाजुळव करणे थोडे कठीण जाते.” थोडक्यात सांगायचे, तर जेट लॅग म्हणजे आपल्या शरीराचे अंतर्गत घड्याळ आणि आपण ज्या नवीन टाईम झोनमध्ये गेलो आहोत, तिथली वेळ यांच्यात झालेला बेबनाव होय. ‌‘जेट लॅग‌’ हा शब्द पहिल्यांदा 1966 मध्ये ‌‘लॉस एंजेलिस टाईम्स‌’च्या एका लेखात पत्रकार होरेस सटन यांनी वापरला होता. त्यांनी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षणांचे वर्णन ‌‘हँगओव्हर सारखे‌’ असे केले होते. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे स्लीप मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. चार्ल्स झीस्लर म्हणतात, “सटन यांनी त्यावेळी लिहिले होते की, विमाने इतक्या वेगाने प्रवास करतात की, ती तुमच्या शरीराची नैसर्गिक लय मागे सोडून जातात.

विमानांचा शोध लागण्यापूर्वी लोक जमिनीवरून किंवा जहाजाने इतका सावकाश प्रवास करायचे की, त्यांच्या शरीराचे अंतर्गत घड्याळ कधी बिघडत नव्हते.” “जर तुमच्या शरीराची अंतर्गत घड्याळ प्रणाली व्यवस्थित काम करत असेल, तर तुम्हाला जेट लॅगचा त्रास होणारच. ही शरीराची अत्यंत सामान्य प्रतिक्रिया आहे,” असे डॉ. झीस्लर यांनी स्पष्ट केले. वयोवृद्ध लोक, वारंवार विमान प्रवास करणारे किंवा आधीपासूनच झोपेचे आणि मानसिक आजार असलेल्या लोकांना जेट लॅगची लक्षणे जास्त जाणवतात. हा त्रास वरवर साधा वाटत असला, तरी याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जेव्हा घड्याळ पुढे केले जाते (ज्यामुळे 1 तासाचा जेट लॅग होतो), तेव्हा प्राणघातक रस्ते अपघातांमध्ये वाढ होते.

लांब पल्ल्याच्या प्रवासानंतर लगेच गाडी चालवणे धोकादायक ठरते. कारण, झोपेची कमतरता अपघातांना आमंत्रण देते. परदेशात प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या अपैसर्गिक मृत्यूचे रस्ते अपघात हे मुख्य कारण आहे. डॉ. झीस्लर यांच्या मते, शरीराच्या अंतर्गत लयीत (उळीलरवळरप ीहूींहाी) अचानक बदल झाल्यामुळे लोक तीव्र नैराश्य (ऊशीिशीीळेप) किंवा उन्मादाच्या (चरपळर) विळख्यात जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news