Goblin Shark : दुर्मीळ ‘गॉब्लिन शार्क’ पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद!

समुद्राच्या अथांग खोलीतील महाकाय रहस्य उलगडले
Goblin Shark
दुर्मीळ ‘गॉब्लिन शार्क’ पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद!
Published on
Updated on

लंडन : समुद्राच्या अथांग आणि गूढ खोलीत राहणाऱ्या जीवांबद्दल नेहमीच नवनवीन खुलासे होत असतात. अशाच एका अत्यंत दुर्मीळ आणि रहस्यमयी समजल्या जाणाऱ्या ‘गॉब्लिन शार्क’ या माशाला पहिल्यांदाच जिवंत असताना कॅमेऱ्यात कैद करण्यात यश आले आहे. अंतराळ विज्ञानाइतकीच गुंतागुंतीची समजली जाणाऱ्या या सागरी विश्वातील या ऐतिहासिक क्षणामुळे संशोधक भारावून गेले आहेत. एका शास्त्रज्ञाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘मला कधीच वाटलं नव्हतं की आपण या माशाला कधी जिवंत आणि पोहताना पाहू शकू.’

गॉब्लिन शार्क हा समुद्राच्या अत्यंत खोल भागात, जिथे सूर्याचा प्रकाशही पोहोचू शकत नाही, अशा अंधाऱ्या विश्वात राहतो. याचा विचित्र आणि काहीसा भीतिदायक चेहरा, लांबट नाक आणि बाहेर येणारा जबडा यामुळे याला ‘गॉब्लिन’ (एक काल्पनिक अक्राळविक्राळ रूप) हे नाव देण्यात आले आहे. हा मासा सहजासहजी मानवी नजरेला पडत नाही आणि आजवर त्याचे केवळ मृत अवशेष किंवा जाळ्यात अडकलेले मृत मासे शास्त्रज्ञांना पाहायला मिळाले होते. अत्याधुनिक अंडरवॉटर कॅमेऱ्यांच्या मदतीने या शार्कला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जिवंतपणे पोहताना टिपले गेले आहे. या ऐतिहासिक दृश्यामुळे समुद्राच्या खोलीत राहणाऱ्या या ‘जिवंत जीवाश्मा’चा जीवनक्रम, त्याच्या शिकारीची पद्धत आणि त्याचे वर्तन समजून घेण्यास सागरी जीवशास्त्रज्ञांना मोठी मदत होणार आहे. या दुर्मीळ चित्रफितीमुळे महासागराच्या तळाशी दडलेल्या अनेक अनुत्तरित रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news