

रियाध : सौदी अरेबियाची राजकुमारी ग्लॅमरस, फॅशनेबल व आधुनिक असू शकते याची आपण कदाचित कल्पनाही करणार नाही. मात्र अमीरा अल-तावील नावाची ही राजकुमारी अशीच आहे. समाजकार्य, विशेषतः महिलांसाठी काम करण्यात रुची असलेली ही श्रीमंत राजकुमारी तिच्या सौंदर्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहे.
2008 साली अमीराचा तिच्या वयापेक्षा 28 वर्षे मोठ्या प्रिन्स अल वलीद बिन तलालशी लग्न झाले होते; मात्र 2013 मध्ये दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत सौदीतील सर्वाधिक श्रीमंत शेख आणि प्रिन्स अल वलीद बिन तलालला अटकही करण्यात आली होती. तलालला फोर्ब्सने अरेबियन देशातील ‘वॉरेन बफेट’ म्हणून संबोधले होते. तलालप्रमाणेच त्याची एक्स वाईफ अमीरा अल तवील हिला तिच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. त्याशिवाय अमीराला सर्वाधिक मॉर्डर्न राजकुमारी म्हटले जाते. अमीराने हिजाब किंवा बुरखा परिधान करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. अमीरा सौदी अरेबियाच्या सर्वात श्रीमंत शेखची एक्स वाईफ असली तरीही तिला लोक तिच्या सामाजिक कार्यासाठी ओळखतात. जगभरातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन सोडविण्यासाठी या राजकुमारीने तब्बल 70 पेक्षा अधिक देशांचा दौरा केलेला आहे. ही राजकुमारी तस्मे सोशल इनिशिएटिव्ह सेंटरचे संचालिका आणि सहसंस्थापक आहे. महिलांच्या अधिकारांसाठी प्रयत्नशील असणारी राजकुमारी मानले जाते. अमीरा शाही परिवारातील अशी पहिली राजकुमारी आहे जिने अबाया परिधान करण्यास स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला संपूर्ण शरीर झाकता येईल, असा पोशाख ती घालायची; मात्र काही काळानंतर तिने युरोपियन स्टाईल ड्रेस घालण्यास सुरुवात केली.