World's Most Valuable Mineral | रशियन शास्त्रज्ञांनी शोधले जगातील सर्वात महागडे खनिज

१ मिलिमीटरची किंमत १४५ डॉलर्स!
World's Most Valuable Mineral |
World's Most Valuable Mineral | रशियन शास्त्रज्ञांनी शोधले जगातील सर्वात महागडे खनिज
Published on
Updated on

मॉस्को : रशियन शास्त्रज्ञांनी सोन्यापेक्षाही महागड्या खनिजाचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. रशियन वृत्तसंस्था ‘स्पुतनिक’ने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी कोला द्वीपकल्प येथील खिबिनी मॅसिफच्या किरोव्स्की खाणीमध्ये या नव्या खनिजाची ओळख पटवली आहे. रशियन शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ‘स्पुतनिक’ला माहिती दिली की, या नव्या खनिजाचे नाव 'कोला ॲशक्रॉफ्टाईन' (Kola Ashcroftine) असे ठेवण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या मते, खडकावरील या नव्या खनिजाच्या एका पातळ थराची सरासरी किंमत १४५ डॉलर्स प्रति मिलिमीटर आहे, जी सोन्याच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे.

रशियन संशोधकांनी सांगितले की, ‘हे आता केवळ एक सुंदर खनिज उरलेले नाही, तर हा पृथ्वीच्या वरच्या थराचा एक रासायनिक दस्तावेज आहे. एकाच स्फटिकामध्ये इट्रिअम, सिलिकॉन, पोटॅशियम, सोडियम आणि संपूर्ण मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Periodic Table) समाविष्ट आहे.’ प्रवक्त्याने पुढे सांगितले की, कोला ॲशक्रॉफ्टाईनचे वैशिष्ट्य म्हणजे यात कॅल्शियम, मँगनीज आणि फ्लोरीनची उपस्थिती आहे; तर याची स्फटिक रचना विज्ञानाला माहीत असलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या खनिज रचनांपैकी एक आहे. ‘स्पुतनिक’नुसार, क्लासिक ॲशक्रॉफ्टाईन हे गुलाबी रंगाचे, पारदर्शक, सहज तुटणारे आणि अतिशय दुर्मीळ सिलिकेट खनिज आहे. याचे साठे ग्रीनलँड, कॅनडा आणि इटलीमध्ये आढळतात.

वैज्ञानिक भाषेत ॲशक्रॉफ्टाईनला प्रामुख्याने Ashcroftine-(Y) म्हटले जाते. निसर्गात आढळणारे हे अत्यंत दुर्मीळ आणि अतिशय गुंतागुंतीचे खनिज आहे. ॲशक्रॉफ्टाईन हे पोटॅशियम, सोडियम, इट्रिअम, कॅल्शियम सिलिकेट कार्बोनेट खनिज आहे. याचे रासायनिक सूत्र (Chemical formula) विज्ञानाच्या जगतातील सर्वात मोठे आणि गुंतागुंतीचे मानले जाते. यात मोठ्या प्रमाणात इट्रिअम (Yttrium) समाविष्ट असते, जो एक दुर्मीळ घटक आहे. याची स्फटिक रचना इतकी विशाल आणि गुंतागुंतीची असते की, ती समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. हे सामान्यतः हलक्या गुलाबी, पांढऱ्या किंवा हलक्या जांभळ्या आणि तपकिरी-गुलाबी रंगात आढळते. याचे स्फटिक सुईसारख्या पातळ किंवा तंतुमय गुच्छांच्या रूपात दिसतात, त्यामुळे ते दिसायला अत्यंत सुंदर दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news