Korea royal sacrifice history | कोरियात राजघराण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा दिला जात असे बळी

Korea royal sacrifice history |
Korea royal sacrifice history | कोरियात राजघराण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा दिला जात असे बळी
Published on
Updated on

सेऊल : सुमारे 1,500 वर्षांपूर्वी सध्याच्या दक्षिण कोरियाच्या भागात स्थानिक राजघराण्यातील व्यक्तींच्या सन्मानार्थ संपूर्ण कुटुंबाचा बळी दिला जात असे, असा धक्कादायक खुलासा एका नवीन आनुवंशिक (जेनेटिक) अभ्यासातून झाला आहे. या संशोधनामुळे त्या काळातील महिलांवर आणि त्यांच्या वंशजांवर केंद्रित असलेल्या एका दाट नातेसंबंधाच्या पद्धतीवरही प्रकाश पडला आहे.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात बुधवारी (8 एप्रिल) प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने कोरिया द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात असलेल्या ‘ग्योंगसान’ येथील इमडांग-जोयॉन्ग दफनभूमीतील 78 सांगाड्यांची तपासणी केली. या थडग्यांची निर्मिती चौथी ते सहावी शताब्दीदरम्यान, म्हणजेच ‘थ—ी किंगडम्स’ कालखंडात झाली होती. ऐतिहासिक नोंदींनुसार, त्या काळातील ‘सिल्ला’ साम्राज्यात ‘सुनजांग’ नावाची प्रथा अस्तित्वात होती. या प्रथेनुसार, स्थानिक उच्चभ्रू किंवा राजघराण्यातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यासोबत त्यांच्या सेवकांचा किंवा आश्रितांचा बळी देऊन त्यांना त्याच थडग्यात गाडले जात असे.

78 सांगाड्यांच्या डीएनए विश्लेषणातून संशोधकांना नातेसंबंधांची गुंतागुंतीची माहिती मिळाली आहे. संशोधकांना 11 अशा जोड्या सापडल्या ज्यांचे नाते पहिल्या श्रेणीतील (आई-वडील आणि मुले किंवा भावंडे) होते. तसेच, 23 जोड्या दुसर्‍या श्रेणीतील नातेवाईक (आजी-आजोबा आणि नातवंडे किंवा काकू-पुतणी) होत्या. राजघराण्यातील व्यक्तींसोबतच ज्यांचा बळी दिला गेला, अशा सामान्य लोकांमध्येही रक्ताच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करण्याची प्रथा होती. अगदी चुलत भावंडांमध्ये झालेल्या विवाहाचे पुरावेही यात सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news