रोबोटिक कुत्रा विरुद्ध ड्रोन लढाई!

एक चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय
Robotic dog vs drone battle
रोबोटिक कुत्रा विरुद्ध ड्रोन लढाई!Pudhari File Photo
Published on
Updated on

बीजिंग : एक चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये एका रोबोटिक कुत्र्याने आणि ड्रोनने एकमेकांवर फटाके डागून जोरदार लढत दिली. या द़ृश्याने भविष्यातील युद्ध संघर्षाचा अंदाज लावता येऊ शकतो. अर्थात, प्रत्यक्ष अशा लढती काही दशके दूर असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या व्हिडीओत मोकळ्या मैदानात ड्रोन आणि रोबोटिक कुत्रा आमने-सामने उभे आहेत. ड्रोन हवेत तरंगत आहे आणि आपल्या चार प्रोपेलर्सच्या मदतीने कुत्र्याच्या फायरिंगपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी रोबोटिक कुत्रा वारंवार फटाके डागतो, आपली जागा बदलून योग्य कोन साधतो आणि ड्रोनच्या आक्रमणापासून वाचतो. आयोजकांनी रोबोटिक कुत्र्याच्या पाठीवर फटाके बसवले होते, जेणेकरून ते ड्रोनवर अचूक हल्ला करू शकेल. ड्रोनच्या लँडिंग गिअरवरदेखील फटाके बसवले होते. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष अधिकच रंगला; मात्र हे यंत्रणेने स्वतः नियंत्रित केले की मानवी हस्तक्षेप होता, हे स्पष्ट नाही. व्हिडीओतील एका व्यक्तीने ड्रोन उडवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या अहवालानुसार, त्यावर भविष्यातील युद्धसज्ज रोबोटस्बाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘भविष्यात रोबोटस् एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील का? कदाचित, आणि काही प्रमाणात हे युद्ध आधीच सुरू झाले आहे,’ असे जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी येथील अभियंत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका मिसी कमिंग्स यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे स्वायत्त शस्त्रनिर्मिती शक्य झाली आहे. अनेक देश, विशेषतः अमेरिका, युद्ध आणि संरक्षण क्षेत्रात एआयचा वापर करत आहेत. आधुनिक शस्त्रसज्ज रोबोटस् आणि ड्रोन माणसाच्या मदतीशिवाय टार्गेट शोधून त्यांच्यावर हल्ला करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news