

बीजिंग : एका चिनी रोबोटिक्स कंपनीने विकसित केलेल्या मानवी चेहर्याच्या रोबोने आपल्या अत्यंत जिवंत भावनिक आविष्कारांमुळे जागतिक लक्ष वेधून घेतले आहे. ‘अहेडफॉर्म’ नावाच्या या स्टार्टअप कंपनीने तयार केलेल्या या रोबोचे प्रात्यक्षिक नुकतेच अनेक माध्यमातून, विशेषत: एका व्हायरल यू ट्यूब व्हिडीओ आणि ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’च्या वृत्तामुळे हा रोबो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
या स्त्रीरूपातील रोबोचे नाव झुआन असून, व्हायरल फुटेजमध्ये ती अत्यंत हळूवारपणे पापण्यांची उघडझाप करताना, मान हलवताना आणि द़ृष्टी व हावभावांमध्ये सूक्ष्म बदल करताना दिसत आहे, जे अगदी हुबेहूब मानवासारखे वाटतात. ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’ नुसार, एका द़ृश्यात रोबो ‘एक गूढ किंवा प्रश्नात्मक भाव’ दर्शवताना आणि ‘अविश्वसनीयरीत्या जिवंत’ पद्धतीने डोळे मिचकावताना दिसतो. या रोबोच्या भावनिक हावभावांचे रहस्य तिच्या मुख्य रचनेत दडलेले आहे. स्वयं-पर्यवेक्षित एआय अल्गोरिदम (self- supervised AI algorithms). उच्च- DOF बायोनिक अॅक्च्युएशन ( high- DOF bionic actuation) या तंत्रज्ञानामुळे प्रणाली खरीखुरी मानवी संवाद प्रतिबिंबित करणारे सूक्ष्म-भाव आणि चेहर्यावरील हालचाली अचूकपणे (replicate) करू शकते.
अहेडफॉर्म कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही रचना ‘भविष्यातील AGI ( Artificial General Intelligence) ला अस्सल भावना आणि जिवंत चेहर्यावरील भाव व्यक्त करण्यास सक्षम करते’, ज्यामुळे भावनिकद़ृष्ट्या अधिक संवेदनशील मशिन (emotionally attuned machines) तयार करण्याचा मार्ग मोकळा होतो. झुआन ही अहेडफॉर्मच्या एल्फ सिरीजमधील रोबो असून, यात रोबोटिक्स आणि कल्पनारम्य-प्रेरित सौंदर्यशास्त्र यांचा मिलाफ आहे. तिचे लांब कान, शिल्पकलायुक्त गालाची हाडे आणि एकंदरीत अस्तित्व तिला ‘एल्व्हिश’ आणि भविष्यातील रोबोचा अनुभव देते. कंपनीने तिला शिल्पकलेच्या अचूकतेने तयार केले आहे आणि भावनिक अनुनाद निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे, म्हणजेच, ती केवळ एक मशिन नसून, एका पात्रासारखी जाणवणारी आहे.
झुआनमध्ये चेहर्यावरील हावभावांसाठी 30 डिग्रीज ऑफ फ्रीडमपर्यंतची क्षमता आहे. यामुळे भुवयांची बारीक हालचाल किंवा डोळ्यांमध्ये दिसणारे आश्चर्याचे सूक्ष्म भाव यांसारख्या वास्तविक-वेळेतील आणि द्रवरूप प्रतिक्रिया ती देऊ शकते. झुआनच्या या जिवंत भावांचे मूळ एका खास डिझाईन केलेल्या ब्रशलेस मोटरमध्ये आहे. तंत्रज्ञान माध्यमांनी याची पुष्टी केली आहे की, ही मोटर अति-शांत, अति-प्रतिसाद देणारी (super responsive) आणि रोबोच्या डोक्यात सहज बसू शकेल एवढी लहान आहे. चेहरा ओळख आणि समक्रमित भाषणासह, ही प्रणाली रोबोला नैसर्गिक वाटणारा डोळ्यांचा संपर्क साधण्यास आणि सभोवतालच्या घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यास मदत करते. जरी शांघाय किंगबाओ इंजिन रोबोसारख्या काही कंपन्या स्टोअर्स, हॉस्पिटल्स, शाळा आणि ई-कॉमर्स लाईव्हस्ट्रीमिंगमध्ये वास्तववादी दिसणारे अँड्रॉईडस् आणत असल्या, तरी त्यांचे लक्ष खोल भावनिक संवादावर नाही, तर पृष्ठभागीय स्तरावर लोकांचे लक्ष वेधण्यावर आहे.