मेंदूसाठी उपयुक्त ‘हे’ भाजलेले पदार्थ

बदाम भाजल्यानंतर खाल्ल्याने त्याची चव आणि फायदे दोन्ही वाढतात
 roasted foods beneficial for the brain
मेंदूसाठी उपयुक्त ‘हे’ भाजलेले पदार्थ.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोणत्याही व्यक्तीला पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी त्याच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्याच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. शरीर सुद़ृढ ठेवण्यासाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयींसोबत योगासने आणि व्यायामाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मन निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणजेच काही गोष्टींचा आहारात समावेश करून मेंदूला निरोगी ठेवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे भाजल्यावर मेंदूला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात आणि मेंदू दीर्घकाळ निरोगी आणि तीक्ष्ण राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात. हे पदार्थ तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या रोजच्या आहारात सहज समाविष्ट करू शकता.

भाजलेले बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळेच ते मेंदूसाठी सुपरफूड मानले जाते. तुम्ही तुमच्या आहारात बदाम अनेक प्रकारे समाविष्ट करू शकता; पण भाजल्यानंतर खाल्ल्याने त्याची चव आणि फायदे दोन्ही वाढतात. कढईत साधारणपणे भाजून किंवा थोड्या तुपात तळूनही तुम्ही ते खाऊ शकता. अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करून ते मेंदूचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते.

भाजलेले अक्रोड

भाजलेले अक्रोडदेखील मेंदूसाठी खूप आरोग्यदायी मानले जाते. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते, जे मेंदूच्या पेशी मजबूत करून बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. न्याहारी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये भाजलेले अक्रोड खाल्ल्यानेदेखील आरोग्य सुधारते. याशिवाय ते अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते, जे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करते.

भाजलेले काजू

काजू मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये हेल्दी फॅट, झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे न्यूरॉन्समधील रक्ताभिसरण नियंत्रणात राहते. काजूचे सेवन केल्याने स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. भाजलेले काजू तुम्ही नाश्ता आणि स्नॅकसाठी खाऊ शकता. मुलांसाठीही स्नॅक्सचा हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो.

भाजलेले बीट

बीटमध्ये व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेटस्, बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतात. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. जे मनाला आराम देते आणि त्यात आढळणारे व्हिटॅमिन ‘ए’ मेंदूच्या कार्याला गती देण्यास मदत करते. बीट भाजून आरोग्यदायी आणि चवदार नाश्ता तयार करता येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news