

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने 3 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर ते रायसिन नावाचे घातक रासायनिक विष तयार करण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. हे विष अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक असून, याचा वापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा यांच्याविरोधातही केला गेला होता.
हे दहशतवादी रायसिन नावाचे घातक रासायनिक विष तयार करण्याच्या तयारीत होते. हा तोच पदार्थ आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक शस्त्रास्त्रांच्या सर्वात घातक श्रेणीत येतो. प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, सय्यदने आपल्या रासायनिक ज्ञानाचा गैरवापर करत रायसिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
रायसिन विष इतके घातक आहे की, त्याचा केवळ 1.78 मिलीग्रामचा अंश एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी पुरेसा असतो. हे विष श्वासावाटे, इंजेक्शनद्वारे किंवा गिळल्यास शरीरात गेल्यानंतर 48 ते 72 तासांत आपला जीवघेणा परिणाम दाखवते.
केवळ 1.78 मिलीग्राम रायसिन एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी पुरेसे आहे.
हे श्वासावाटे, इंजेक्शनद्वारे किंवा गिळल्यास 48 ते 72 तासांत प्राणघातक ठरते.
यावर अद्याप कोणतेही प्रतिविष किंवा उपचार विकसित झालेले नाहीत.
2013 : अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना 2013 मध्ये दोनदा रायसिन असलेले पत्र पाठवण्यात आले होते.
2018 आणि 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनाही 2018 आणि 2020 मध्ये रायसिनयुक्त वस्तू पाठवण्यात आल्या होत्या.
गुजरातमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे रासायनिक उपकरणे आणि रायसिन तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायने सापडली आहेत. तपास अधिकार्यांच्या मते, आरोपी रायसिन तयार करण्याच्या प्राथमिक रासायनिक प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. तपास यंत्रणा आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, रायसिनचा वापर कुठे आणि केव्हा केला जाणार होता आणि ते बनवण्यासाठी दहशतवादी डॉक्टरला आणखी कोणी कोणी मदत केली.