भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकाने अंतराळात पाठवला समोसा

Published on
Updated on

लंडन : पाश्‍चात्त्य देशांमध्ये भारतीय रेस्टॉरंट आणि 'करी' अतिशय लोकप्रिय आहे. असे रेस्टॉरंटस् भारतीय खाद्यपदार्थांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटची आता अनोख्या कारणासाठी चर्चा होत आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाने चक्‍क अंतराळात समोसा पाठवण्याचा अफलातून प्रयत्न केला!

ब्रिटनमधील बाथ शहरातील 'चायवाला' नावाच्या लोकप्रिय रेस्टॉरंटच्या मालकाने हा प्रयत्न केला. त्यासाठी वेदर बलूनचा वापर करण्यात आला. मालकाने अंतराळात समोसा पाठविण्यासाठी तीनवेळा प्रयत्न केला. दोन प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर तिसर्‍या प्रयत्नामध्ये बरेचसे यश मिळाले. निरज गाधेर असे या माणसाचे नाव आहे. त्यांनी सांगितले की मी समोसा अंतराळातही पाठवेन असे एकदा गंमतीने म्हटलो होतो. सध्याच्या कोरोना संकटकाळात लोकांच्या चेहर्‍यावर थोडे हसू आणण्यासाठी हा प्रयत्न करून पाहुया असे मी ठरवले आणि हा प्रयोग केला. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये हेलियमच्या फुग्यांचा वापर झाला होता. पहिल्या प्रयत्नात हा फुगा हातातून निसटला तर दुसर्‍या प्रयत्नात फुग्यामध्ये हेलियम पुरेसा नव्हता. अखेर तिसर्‍या प्रयत्नात यश मिळाले; पण फुगा सोडल्यानंतर काही काळाने त्याचा जीपीएसशी असलेला संपर्क तुटला आणि तो फ्रान्समधील एका शेतात कोसळला. या फुग्यामध्ये कॅमेरा आणि जीपीएस ट्रॅकरही लावला होता.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news