lazy eye treatment | संशोधकांना ‘आळशी डोळा’ बरा करण्याचा नवीन मार्ग सापडला?

lazy eye treatment
lazy eye treatment | संशोधकांना ‘आळशी डोळा’ बरा करण्याचा नवीन मार्ग सापडला?File Photo
Published on
Updated on

टोरांटो : संशोधकांना ‘आळशी डोळा’ (Amblyopia) नावाची समस्या उलटवण्यासाठी एक संभाव्य मार्ग सापडला आहे. विशेष म्हणजे, या पद्धतीमुळे लहानपणापासून ही समस्या असलेल्या प्रौढांमध्येही द़ृष्टी सुधारण्याची शक्यता आहे. सध्या तरी, हे तंत्र केवळ प्राण्यांवरच (उंदरांवर) तपासले गेले आहे. त्यामुळे मानवी रुग्णांसाठी वापरण्यापूर्वी यावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

‘सेल रिपोर्ट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या उंदरांवरील एका अभ्यासात ही नवीन पद्धत सादर करण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये कमजोर डोळा तात्पुरता बंद केला जातो, ज्यामुळे अ‍ॅम्ब्लिओपिया बरा होण्यास मदत होते, अगदी दीर्घकाळ द़ृष्टीची समस्या असल्यानंतरही. या ‘आळशी डोळ्या’ला पुन्हा सुरू केल्यामुळे द़ृष्टिपटलातून द़ृश्य सिग्नल मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्सपर्यंत पोहोचवणार्‍या चेतापेशींच्या क्रियाकलापात अचानक वाढ होते, असे दिसून आले.

या अभ्यासात सामील नसलेले कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू येथील स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री अँड व्हिजन सायन्सचे प्राध्यापक आणि संचालक बेन थॉम्पसन म्हणाले, ‘अ‍ॅम्ब्लिओपियाच्या उंदराच्या मॉडेलमध्ये अ‍ॅम्ब्लिओपिक डोळा निष्क्रिय केल्याने द़ृष्टी परत येते, हे प्रोत्साहक आहे.’ मात्र, ही पद्धत मानवांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही, हे पाहण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे, असे थॉम्पसन यांनी सांगितले. या अभ्यासात सामील नसलेले कॅलिफोर्निया विद्यापीठातील (बर्कले) ऑप्टोमेट्री आणि व्हिजन सायन्सचे प्राध्यापक डॉ. डेनिस लेव्ही यांनीही निष्कर्षांबद्दल सावधपणे आशावाद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये ‘आळशी डोळा’ बरा करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते मानवांमध्ये प्रभावी ठरले नाहीत. मात्र, हे नवीन तंत्र आशादायक दिसत आहे.

‘आळशी डोळा’ म्हणजे काय?

अ‍ॅम्ब्लिओपिया (Amblyopia), ज्याला ‘आळशी डोळा’ (लेझी आय) म्हणतात, लहानपणी विकसित होतो. यामध्ये मेंदू एका डोळ्याला दुसर्‍यापेक्षा जास्त महत्त्व देतो, ज्यामुळे कमी महत्त्व दिलेल्या डोळ्याची द़ृष्टी हळूहळू कमी होते. यावरचा पारंपरिक उपचार म्हणजे डोळ्यावर मजबूत पट्टी लावणे, जेणेकरून मेंदूला कमजोर डोळ्यावर अवलंबून राहण्यास भाग पाडता येईल. मात्र, ही पद्धत केवळ लहानपणीच प्रभावी ठरते, जेव्हा द़ृष्टीचे नियंत्रण करणार्‍या मज्जातंतूंच्या जोडण्या (neural connections) अजून तयार होत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news