Thermal Radiation | उष्णतेच्या उत्सर्जनावर संशोधकांनी मिळवले नियंत्रण

विजेऐवजी उष्णतेने डेटा स्टोअर करणे आता शक्य
Thermal Radiation |
Thermal Radiation | उष्णतेच्या उत्सर्जनावर संशोधकांनी मिळवले नियंत्रणOlivia Maule
Published on
Updated on

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी एका अशा नावीन्यपूर्ण पदार्थाचे (मटेरियल) डिझाईन तयार केले आहे, ज्याद्वारे उष्णता उत्सर्जित करण्याची पद्धत थेट ‘प्रोग्राम’ करता येऊ शकते. या शोधामुळे अधिक कार्यक्षम ऊर्जा प्रणाली विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भविष्यात विजेऐवजी उष्णतेचा वापर करून माहिती (डेटा) साठवणारी साधने (स्टोरेज डिव्हाईसेस) तयार करणे शक्य होणार आहे.

‘लेसर अँड फोटोनिक्‍स रिव्‍ह्यू’ या नियतकालिकात २५ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात या डिझाईनचे वर्णन करण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानाने भौतिकशास्त्रातील जवळपास १६० वर्षे जुन्या नियमाला छेद दिला आहे. सामान्य परिस्थितीत, एखादा पदार्थ ज्या दिशेने उष्णता शोषून घेतो, त्याच दिशेने ती उत्सर्जित करतो. १९ व्या शतकात प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांनी मांडलेल्या या ‘रेसिप्रॉसिटी’च्या (परस्परतेच्या) नियमामुळे पदार्थात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या उष्णतेवर स्वतंत्रपणे नियंत्रण ठेवण्यावर आतापर्यंत मर्यादा येत होत्या.

नव्या अभ्यासात संशोधकांनी एका अशा सैद्धांतिक उपकरणाची रचना केली आहे, जे औष्णिक विकिरण वेगवेगळ्या दिशांना वळवू शकते आणि वीज प्रवाह बंद झाल्यावरही ती रचना लक्षात ठेवू शकते. या उपकरणात सामान्यतः एकत्र न वापरल्या जाणाऱ्या दोन पदार्थांचा मिलाफ करण्यात आला आहे. संशोधकांनी चुंबक क्षेत्राचा वापर करून ‘इंडियम आर्सेनाईड’ या इन्फ्रारेड प्रकाश शोषणाऱ्या आणि उत्सर्जित करणाऱ्या पदार्थाच्या थरातील नैसर्गिक सममिती मोडली. त्यामुळे एका दिशेने प्रवास करणारे विकिरण दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या विकिरणापेक्षा वेगळे वर्तन करते. या थरावर ‘जर्मेनियम-अँटिमोनी-टेल्युरियम’ (GST) या फेज-चेंजिंग पदार्थाची एक जाळी बसवण्यात आली आहे. हा पदार्थ स्वतःची भौतिक रचना बदलू शकतो आणि वीज बंद झाल्यावरही नव्या रचनेत स्थिर राहतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news