जितके भूकंप होतील, तितके जमिनीत तयार होईल सोने

सोनं कसं आढळतं, हे जाणून घेण्यासाठी संशोधन
Research was done to know how gold is found
भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावलाPudhari File Photo
Published on
Updated on

मेक्सिको : सर्वांत विध्वंसक नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाचा समावेश होतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे भूकंप होणे अर्थातच कोणालाही नको असते; मात्र याच भूकंपामुळे सोन्याची निर्मिती होते, हे फार कमी जणांना माहिती असेल. शास्त्रज्ञांनी याबाबत मोठा शोध लावला आहे. भूकंपामुळे क्वार्टझ् (सिलिकॉन डायऑक्साईडपासून तयार झालेलं खनिज) क्वार्ट्झमधून जाणार्‍या फ्रॅक्चर लाइन्समध्ये सोन्याचे गोळे तयार होतात, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

क्वार्टझ् हे पृथ्वीच्या कवचात विपुल प्रमाणात आढळणारे खनिज आहे. क्वार्ट्झ हे पायझोइलेक्ट्रिक मटेरियल आहे. म्हणजेच जेव्हा त्यावर यांत्रिक ताण पडतो तेव्हा त्यातून इलेक्ट्रिक चार्ज तयार होऊ शकतो. या गुणवत्तेमुळे हे खनिज घड्याळं आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. द्रवरूपातल्या सोन्यातल्या आयन्सचे स्थायूरूपात रूपांतर करण्याकरिता इलेक्ट्रॉन मिळवण्याकरिता वीज कारणीभूत ठरू शकते.

सोनं कसं आढळतं, हे जाणून घेण्यासाठी संशोधन

ऑस्ट्रेलियातल्या मोनाश युनिर्व्हिसिटीतले जिओलॉजिस्ट (भूगर्भशास्त्रज्ञ) आणि नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासाचे प्रमुख लेखक ख्रिस व्हॉइसी यांच्या मते, क्वार्ट्झमध्ये सतत सोन्याची निर्मिती होते. ते कशा प्रकारे निर्माण होतं, हे कोणालाही माहिती नव्हतं. लहानशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोनं कसं आढळतं, हे जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. संशोधकांना असे आढळले की, भूकंपामुळे खडकांचे तुकडे होतात. अशा वेळी हायड्रोथर्मल लिक्विड क्वार्ट्झच्या लाइन्समधून बाहेर येते आणि ती जागा द्रवरूपातील सोन्याने भरली जाते. भूकंपाच्या ताणाला प्रतिसाद म्हणून, क्वार्ट्झ लाइन्स इलेक्ट्रिक चार्ज तयार करतात. त्याची सोन्याशी प्रतिक्रिया होते आणि कालांतराने त्याला स्थायूरूप मिळतं. प्रत्येक भूकंपानंतर अशा प्रकारे जमा झालेल्या सोन्यात वाढ होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news