Reels effect sleep | ‘रील्स’ पाहण्याच्या सवयीने ‘जेन झी’च्या झोपेवर परिणाम

Reels effect sleep |
Reels effect sleep | ‘रील्स’ पाहण्याच्या सवयीने ‘जेन झी’च्या झोपेवर परिणाम
Published on
Updated on

मुंबई : आजच्या डिजिटल युगात रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर ‘रील्स’ पाहणे आणि सोशल मीडिया स्क्रोल करणे ही ‘जेन झी’ची, तरुणाईची सवय बनली आहे. मात्र, ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. उशिरापर्यंत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे तरुणांची ‘स्लीप सायकल’ (झोपेचे चक्र) पूर्णपणे बिघडली असून, त्याचे गंभीर परिणाम शरीरावर आणि मनावर होत आहेत.

न्यूरोलॉजी तज्ज्ञांच्या मते, मोबाईल स्क्रीनमधून निघणारा ‘ब्लू लाईट’ शरीरातील ‘मेलाटोनिन’ या हार्मोनची निर्मिती कमी करतो. हे हार्मोन शांत आणि गाढ झोप येण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जेव्हा या हार्मोनचे संतुलन बिघडते, तेव्हा झोप उडते आणि शरीर थकलेले राहते. रात्री उशिरापर्यंत कंटेंट पाहिल्यामुळे मेंदू सतत सक्रिय राहतो. यामुळे गाढ झोप येत नाही. परिणामी चिडचिड होणे, तणाव आणि नैराश्याचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या मते, झोपेची कमतरता केवळ थकवा आणत नाही, तर ती हृदयाच्या आरोग्यासाठीही घातक ठरते.

झोपेचा खराब पॅटर्न भविष्यात ‘स्ट्रोक’ (मेंदूचा झटका) येण्याचे मोठे कारण बनू शकतो. सततच्या अपुर्‍या झोपेमुळे मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता कमी होते. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते आणि शिकण्याची गती मंदावते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. जेव्हा आपण रात्री बातम्या, वादविवाद किंवा झगमगाटी व्हिडीओ पाहतो, तेव्हा मेंदू ‘अलर्ट मोड’वर जातो. यामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ (स्ट्रेस हार्मोन) वाढते, ज्यामुळे सकाळी उठल्यावरही प्रचंड थकवा जाणवतो. झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर नकारात्मक किंवा अस्वस्थ करणार्‍या बातम्या/व्हिडीओ सतत पाहात राहण्याला ‘डूम स्क्रोलिंग’ म्हणतात. यामुळे मेंदू शांत होण्याऐवजी अधिक अस्वस्थ होतो आणि झोपेची गुणवत्ता खराब होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news