निळ्या सापाने कवटाळले लाल गुलाबाला!(Video)

Published on
Updated on

न्यूयॉर्क :

निसर्ग अनेक वेळा थक्‍क करणारी द‍ृश्ये दाखवत असतो. एरवी टपोर्‍या, सुंदर गुलाबावर भिरभिरणारी फुलपाखरे किंवा भुंगे आपण पाहत असतो; मात्र कुणी एक निळाशार साप लालबुंद गुलाबाला कवटाळून बसलेला आहे, असे द‍ृश्य पाहिले नसेल. आता अशाच एका द‍ृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

'प्लॅनेटपीएनजी' नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की 'अतिशय सुंदर ब्ल्यू पिट वायपर'. या व्हिडीओला 91 हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले असून 7.6 हजार लाईक्स मिळाले आहेत. यामध्ये असे दिसून येते, की एका सुंदर, लाल गुलाबावर एक छोटासा व निळाशार साप बसला आहे. विशेष म्हणजे, हा साप नीट दिसावा म्हणून कुणी तरी हा गुलाबही धरून ठेवला होता.

व्हिडीओ बनवण्यासाठी हा गुलाब हळूहळू फिरवतही होता; मात्र हा साप गुलाबावर शांतपणे बसून होता. जणूकाही त्यालाही गुलाबाचा सहवास आवडला. ब्ल्यू पिट वायपर हा साप एक विषारी आणि आक्रमक साप आहे. तो अनपेक्षितपणे चटकन हल्‍ला करू शकतो. त्यामुळे तो गुलाबावर असताना हा गुलाब हलवणे धोक्याचे ठरते, असा सल्‍लाही अनेकांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news