Rubber Boa Snake | कॅनडात जलतरण तलावाजवळ आढळला दुर्मीळ ‘रबर बोआ’ साप

Rubber Boa Snake |
Rubber Boa Snake | कॅनडात जलतरण तलावाजवळ आढळला दुर्मीळ ‘रबर बोआ’ साप
Published on: 
Updated on: 

टोरांटो : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात दुर्मीळ 'रबर बोआ' साप क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे वेस्ट केलोना येथील एका घरमालकाला आपल्या जलतरण तलावाजवळ हा साप आढळल्याची घटना अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. हा साप कॅनडामधील केवळ दोन मूळ बोआ प्रजातींपैकी एक आहे.

या प्रजातीचा वावर दक्षिणेकडे कॅलिफोर्नियापर्यंत विस्तारलेला असून, कॉलोराडो आणि अल्बर्टा येथेही काही वेळा याच्या नोंदी आढळतात. मात्र, ब्रिटिश कोलंबिया ही या सापाची सर्वात उत्तरेकडील सीमा मानली जाते; तसेच जगातील कोणत्याही बोआ प्रजातीच्या तुलनेत हे सर्वात जास्त अक्षांशाचे (लॅटिट्यूड) ठिकाण आहे. जलतरण तलावाच्या कडेला उन्हाचा आनंद घेत बसलेला हा रबर बोआ साप शॉप नामक घरमालकाने पाहिला. त्यांनी सांगितले की, त्यांनी फावड्याच्या मदतीने या सापाला उचलले; त्यावेळी तो थोडासा गुंडाळला गेला. त्यानंतर त्यांनी त्याला आपल्या जागेच्या कडेला असलेल्या खडकांच्या ढिगाऱ्यावर सुरक्षित हलवले. विस्तारत जाणारे शहरीकरण आणि बदलणारे भूप्रदेश यामुळे प्राणी अनपेक्षित ठिकाणी दिसण्याची शक्यता वाढते. ब्रिटिश कोलंबिया प्रशासन या प्रजातीचा मागोवा घेत असल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.