Rare Blood Group | दुर्मीळ रक्तगट वाचवू शकतो लाखो जीव

केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‘आरएच नल’ (Rh null) नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत.
Rare Blood Group
दुर्मीळ रक्तगट वाचवू शकतो लाखो जीव(Pudhari File Photo)
Published on
Updated on

लंडन : केवळ साठ लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आढळणारा ‘आरएच नल’ (Rh null) नावाचा जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट आता प्रयोगशाळेत विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रात रक्तसंक्रमणाने (Blood Transfusion) क्रांती घडवून आणली आहे. दुखापत झाल्यास किंवा मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास, दान केलेले रक्त जीवन वाचवू शकते. परंतु, ज्या लोकांचे रक्तगट दुर्मीळ आहेत, त्यांना त्यांच्याशी जुळणारे रक्त शोधताना खूप संघर्ष करावा लागतो. जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगटांपैकी एक असलेला ‘आरएच नल’ रक्तगट जगभरात केवळ 50 ज्ञात लोकांमध्येच आढळतो. हा रक्तगट साठ लाखांमध्ये फक्त एका व्यक्तीमध्ये आढळतो. अशा व्यक्तींना कधी अपघात झाल्यास आणि रक्तसंक्रमणाची गरज भासल्यास, त्यांना जुळणारे रक्त मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे ‘आरएच नल’ असलेल्या लोकांना त्यांचे स्वतःचे रक्त गोठवून दीर्घकाळ साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Rare Blood Group
Blood Shortage : मुंबईत रक्ताचा तुटवडा; 1101 युनिट शिल्लक

अत्यंत दुर्मीळ असल्याने या रक्तगटाला वैद्यकीय आणि संशोधन समुदायात ‘गोल्डन ब्लड’ म्हणून ओळखले जाते. कारण, ते इतर अनेक कारणांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शास्त्रज्ञ सध्या रक्तदानात येणार्‍या रोगप्रतिकारशक्तीच्या समस्यांवर मात करण्यासाठी मार्ग शोधत आहेत. ‘आरएच नल’ रक्तगट या ‘युनिव्हर्सल ब्लड ट्रान्सफ्युजन’ प्रणालीचा पाया बनण्यास मदत करू शकतो.

आपल्या शरीरात फिरणार्‍या रक्ताचे वर्गीकरण लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील विशिष्ट खुणा किंवा प्रतिजन (Antigens) यांच्या उपस्थितीवर किंवा अनुपस्थितीवर आधारित असते. ही प्रतिजन प्रथिने किंवा शर्करेची बनलेली असतात. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलचे सेल बायोलॉजीचे प्राध्यापक ऍश टॉये स्पष्ट करतात, ‘जर तुमच्या रक्तापेक्षा वेगळ्या प्रतिजन असलेले रक्त तुम्हाला दिले गेले, तर तुमचा रोगप्रतिकारशक्ती त्याविरुद्ध अँटिबॉडीज तयार करते आणि त्या रक्तावर हल्ला करते. पुन्हा एकदा तेच रक्त दिल्यास, ते जीवघेणे ठरू शकते. ‘आरएच नल’ रक्तगटाच्या बाबतीत, Rh प्रतिजन पूर्णपणे अनुपस्थित असतात, ज्यामुळे ते इतके दुर्मीळ आणि मौल्यवान बनते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news