अमेरिकेत टेक्सासच्या रँचवर दुर्मीळ मॅमथचे सापडले सुळे

rare mammoth tusks
अमेरिकेत टेक्सासच्या रँचवर दुर्मीळ मॅमथचे सापडले सुळे
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः पश्चिम टेक्सासमधील एका रँचवर हरणांच्या शोधात असलेल्या शिकार्‍याला अनपेक्षितपणे एक दुर्मीळ मॅमथचा सुळा सापडल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. सुल रॉस स्टेट युनिव्हर्सिटीच्या निवेदनानुसार, हा सुळा बिग बेंड नॅशनल पार्कजवळील ब्रूस्टर आणि प्रेसिडिओ काऊंटीजमधील O2 Ranch मधील एका प्रवाह क्षेत्रात सापडला.

कोलंबियन मॅमथ ( Mammuthus columbi), जो ऊन असलेल्या मॅमथ (Mammuthus primigenius) चा दूरचा दक्षिणी नातेवाईक होता, तो उत्तर आणि मध्य टेक्सासमधील गवताळ प्रदेशांमध्ये सुमारे 11,700 वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता. मात्र, पश्चिम टेक्सासमध्ये मॅमथचे अवशेष सापडणे अत्यंत दुर्मीळ आहे. ‘हा मॅमथचा सुळा पाहून जणू प्राचीन जग समोर उभे राहते,’ असे O2 Ranch चे व्यवस्थापक विल जुएट यांनी सांगितले. ‘आता मला त्या प्रचंड प्राण्याची या टेकड्यांमध्ये फिरण्याची कल्पना येते. आणि त्यानंतर माझ्या मनात एकच विचार येतो, तेव्हाच्या मानवांनी फक्त दगडी हत्यारांच्या मदतीने या प्रचंड सुळ्यांचा सामना कसा केला असेल!’ कोलंबियन मॅमथ मानवासोबत सहअस्तित्वात होते; पण शेवटच्या हिमयुगाच्या समाप्तीला ते नामशेष झाले. त्यांच्या नामशेष होण्यामागे हवामान बदल, मानवी शिकार आणि आजार यांसारख्या विविध कारणांचा विचार संशोधकांनी मांडला आहे. ज्या शिकार्‍याने हा सुळा शोधला, त्याचे नाव निवेदनात उघड केले गेले नाही. त्याने प्रवाहाच्या काठावर सापडलेल्या या जीवाश्माचे फोटो घेतले आणि ते विल जुएट यांना दाखवले. त्यानंतर जुएट यांनी सुल रोस स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग बेंड स्टडी सेंटरचे संचालक ब—ायन श्रोडर आणि इतर पुरातत्त्वतज्ज्ञांशी संपर्क साधला. संशोधकांनी या दुर्मीळ शोधाची सखोल तपासणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news