132 Year Old Magazine | १३२ वर्षांनंतर अमेरिकेतील ग्रंथालयात परत आले दुर्मीळ मासिक!

132 Year Old Magazine |
132 Year Old Magazine | १३२ वर्षांनंतर अमेरिकेतील ग्रंथालयात परत आले दुर्मीळ मासिक!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील एका सार्वजनिक ग्रंथालयात तब्बल १३२ वर्षे उशिराने १९ व्या शतकातील एक दुर्मीळ मासिक सुखरूप परत आले आहे. जॉन हानसन नावाच्या ८४ वर्षीय व्यक्तीने ही जुनी मॅगझिन पुस्तकालयात परत केली आहे.

सप्टेंबर १८९४ मध्ये प्रकाशित झालेली ‘द सेंचुरी इलस्ट्रेटेड मंथली मॅगझिन’ हे मासिक तब्बल १३२ वर्षे एका कुटुंबाकडे पडून होती. हानसन यांना १९६६ मध्ये ते घर बदलत असताना ही मॅगझिन पहिली मिळाली होती; मात्र ती त्यांच्याकडे कशी आली हे त्यांना कधीच समजले नाही. त्यांच्या पालकांकडेही त्या पुस्तकालयाचे कार्ड नव्हते, त्यामुळे ती गिफ्ट म्हणून, रस्त्यावर मिळालेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून किंवा इतर कोणाकडून त्यांच्याकडे आली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

११.५ लाखांचा दंड माफ

नुकताच ग्रंथालयाने उशिराने परत करणाऱ्या पुस्तकांवरील दंड काही काळासाठी माफ करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा वाचल्यानंतर हानसन यांनी ती जुनी मॅगझिन परत करण्याचा निर्णय घेतला. हिशेब केल्यावर हे मासिक तब्बल ४८,२२१ दिवस उशिराने परत आली होते. नियमानुसार यावर तब्बल १४,००० डॉलर्स (सुमारे ११.५ लाख रुपये) दंड आकारला गेला असता; परंतु ग्रंथालयाच्‍या विशेष मोहिमेमुळे हानसन यांना दंड भरावा लागला नाही. १३२ वर्षांनंतर एक ऐतिहासिक मासिक पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी पोहोचल्यामुळे ग्रंथालयानेही यावर आनंद व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news