‘या’ देशात लोकप्रिय आहे ‘रामलीला’

वर्षातून अनेक वेळा असे रामायणावर आधारित प्रयोग
Ramlila is popular in this country
‘या’ देशात लोकप्रिय आहे ‘रामलीला’Pudhari File Photo
Published on
Updated on

जकार्ता : प्राचीन काळातील बृहद्भारताच्या खुणा आजही आशियातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये आग्नेय आशियातील इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडियासारख्या अनेक देशांचाही समावेश आहे. इंडोनेशियात जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोक राहतात; मात्र याठिकाणी आजही रामायण लोकप्रिय असून बाली बेटावर तर आजही मूळ इंडोनेशियन हिंदू बहुसंख्य आहेत. नवरात्रीच्या काळात आपल्याकडे, विशेषतः उत्तर भारतात ठिकठिकाणी ‘रामलीला’ आयोजित केली जाते. विजयादशमी म्हणजेच दसर्‍याला रावणवधाने या रामलीलेची सांगता होते; मात्र इंडोनेशियात वर्षातून अनेक वेळा असे रामायणावर आधारित प्रयोग होत असतात. हे प्रयोग बॅले किंवा नृत्यनाटिकेच्या रूपात असतात व ते स्थानिक जनतेत आणि परदेशी पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहेत.

या देशातील जावा आणि बालीमध्ये रामायण बॅलेचा अद्भुत अनुभव इथले लोक वर्षांनुवर्षे घेत आहे. हे नृत्यनाट्य रामायणावर कथांवर आधारित ते संगीत, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून संवादाशिवायच सादर करण्यात येते. इंडोनेशियातील बालीमध्ये 10 व्या शतकात एक हिंदू मंदिर बांधण्यात आले. यावेळी इथे रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादर करण्यात आले. या कलात्मक प्रेरणांचा स्रोत हे वाल्मिकींनी लिहिलेले रामायण होते. आजही रामायण नृत्यनाट्याची परंपरा आशिया खंडातील देशांमध्ये दिसून येते. इंडोनेशियातील जावा आणि बालीमध्ये या नृत्यनाट्याला ‘केंद्रातरी’ रामायण या नावाने ओखळले जाते, तर थायलंडमध्ये याला ‘रामकीन’ नृत्य आणि कंबोडियामध्ये त्याला ‘रेमकर’ नृत्य असे म्हटले जाते. विशेष म्हणजे इंडोनेशियामध्ये सादर केलेल्या या रामायण नृत्यनाट्याला 2012 मध्ये गिनिज बुकने जगातील सर्वात रंगवलेले नृत्यनाट्य म्हणून नामांकन दिले आहे. जावा द्वीपसमूह हे इंडोनेशियातील मुख्य बेटांपैकी असून हे देशाची राजधानी जकार्ता आणि तिथल्या लोकसंख्येपैकी सुमारे 60% एवढी आहे. सुमारे 13व्या ते 15व्या शतकापर्यंत मजपाहितचे शक्तिशाली हिंदू साम्राज्य येथे भरभराटीला आले होते. त्यांचा संस्कृती आणि भाषेवरील प्रभाव आजही दिसून येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news