Railway station inside palace | राजवाड्याच्या आत चक्‍क रेल्वे स्टेशन!

४ डब्यांची शाही ट्रेन अन् रामपूरच्‍या नबाबाचे अजब थाट
Railway station inside palace |
Railway station inside palace | राजवाड्याच्या आत चक्‍क रेल्वे स्टेशन!
Published on
Updated on

रामपूर : रेल्वे स्टेशन हे शहर किंवा गावांमध्ये असते, परंतु भारताच्या इतिहासात एक असाही नवाब होऊन गेला ज्याने चक्क आपल्या महालाच्या आतच खासगी रेल्वे स्टेशन बांधले होते. उत्तर प्रदेशातील रामपूरचा नवाब हमीद अली खान याच्या या अनोख्या छंदाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवाब हमीद अली खान याने आपली सुविधा आणि शाही थाटासाठी करोडो रुपये खर्च करून हे खासगी रेल्वे स्टेशन बनवले होते. विशेष म्हणजे, रेल्वे रुळ थेट नवाबाच्या महालापर्यंत पोहोचत असत. यासाठी सुमारे ४० किलोमीटर लांबीची विशेष रेल्वे लाईन टाकण्यात आली होती. जेव्हा नवाबाला दिल्ली किंवा लखनऊला जायचे असे, तेव्हा तो त्‍याच्‍या चार डब्‍यांच्‍या खासगी रॉयल ट्रेनमध्‍ये बसत असे. या ट्रेनचा डब्‍बा मुख्य ट्रेनला जोडला जात होता.

११३ कोटींचा खर्च आणि भव्य डिझाइन

त्या काळी हे स्टेशन बांधण्यासाठी सुमारे ११३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या स्टेशनची इमारत एखाद्या आलिशान महालासारखीच भव्य होती. १८८९ ते १९३० या काळात राज्य करणाऱ्या नवाब हमीद अली खान याने आपल्या रुबाबाला साजेसा असा हा प्रकल्प उभारला होता.

हे खासगी रेल्वे स्टेशन भारताच्या फाळणीपर्यंत वापरात होते. मात्र, नवाबाच्या निधनानंतर त्याचे उत्तराधिकारी नवाब रजा अली खान हा या व्यवस्थेची पूर्वीसारखी काळजी घेऊ शकला नाही. १९६० च्या दशकापर्यंत हे स्टेशन ओस पडू लागले, रुळांना गंज चढला आणि एकेकाळी शाही थाटात चमकणारे हे ठिकाण केवळ इतिहास बनून राहिले. आज हे स्टेशन सक्रिय नसले तरी रामपूरमधील महाल आणि तिथले वाचनालय आजही या शाही इतिहासाची साक्ष देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news