Microscopic QR technology | जीवाणूपेक्षाही लहान क्यूआर कोड!

Microscopic QR technology |
Microscopic QR technology | जीवाणूपेक्षाही लहान क्यूआर कोड!
Published on
Updated on

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) : संशोधकांनी अवघ्या 1.98 स्क्वेअर मायक्रोमीटर आकाराचा एक क्यूआर कोड तयार केला आहे. हा आकार बहुतांश जीवाणूं (बॅक्टेरिया) पेक्षाही लहान आहे. या विक्रमी कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे. या क्यूआर कोडमधील प्रत्येक पिक्सेल फक्त 49 नॅनोमीटर आकाराचा आहे. हे द़ृश्य प्रकाशाच्या (व्हिजिबल लाईट) तरंग लांबी पेक्षाही 10 पटीने लहान आहे. हा कोड वाचण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो.

संशोधकांनी हा कोड तयार करण्यासाठी अतिशय पातळ अशा सिरॅमिक फिल्म्सचा वापर केला आहे. हे तेच साहित्य आहे जे कठीण अवजारे कापण्यासाठी वापरले जाते. सिरॅमिक हे उष्णता आणि झीज रोखण्यासाठी अत्यंत सक्षम असते. आजचे हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह काही वर्षांनी खराब होतात. मात्र, दगडी कोरीव कामाप्रमाणेच हे सिरॅमिक स्टोरेज माहितीला शेकडो, किंबहुना हजारो वर्षे सुरक्षित ठेवू शकते. या तंत्रज्ञानामुळे एका साध्या ए फोर आकाराच्या कागदावर 2 टेराबाईट (2 टीबी) पेक्षा जास्त डेटा साठवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, हा डेटा जतन करण्यासाठी कोणत्याही विजेची किंवा कुलिंग सिस्टीमची गरज भासत नाही.

संशोधक अलेक्झांडर किरनबॉअर यांच्या मते, ज्याप्रमाणे प्राचीन संस्कृतींनी आपली माहिती दगडावर कोरून हजारो वर्षे टिकवून ठेवली, त्याच संकल्पनेचा वापर करून आम्ही आधुनिक माहिती साठवली आहे. हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक शाश्वत आणि ऊर्जा-बचत करणारे साधन ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news