Dangerous Fitness Stunt | मगरीच्या पाठीवर पुशअप्स!

Dangerous Fitness Stunt |
Dangerous Fitness Stunt | मगरीच्या पाठीवर पुशअप्स!
Published on: 
Updated on: 

लिस्बन : सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये पोर्तुगालच्या एका व्यक्तीने अत्यंत धोकादायक धाडस दाखवत जिवंत मगरीच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून पुशअप्स काढल्याचे दिसून आले आहे. जोआओ सुसा पिंटो असे या माणसाचे नाव आहे. त्याच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘दहा-दहा पुशअप्स काढण्यासाठी मगरीची पाठ योग्य ठिकाण आहे!’

या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती शांतपणे पडलेल्या मोठ्या मगरीच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून अगदी आरामात पुशअप्स मारताना दिसत आहे. पुशअप्स पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्या मगरीच्या डोक्यावर हातही फिरवताना दिसते. शेवटी ही मगर आपले भले मोठे डोके थोडे हलवताना दिसते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, काहींच्या मते ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे तयार केलेली क्लिप असू शकते, तर काही जण या व्यक्तीच्या धाडसाचे आश्चर्य व्यक्त करत आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मगर जेव्हा सूर्यप्रकाश अंगावर घेताना किंवा सुस्त पडलेली असते, तेव्हा काही वेळासाठी ती शांत राहू शकते; परंतु याचा अर्थ असा नाही की ती धोकादायक नाही. अशा प्राण्यांच्या जवळ जाणे किंवा असे स्टंट करणे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.