USB pen drive holes | पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?

USB pen drive holes
USB pen drive holes | पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात ‘पेनड्राईव्ह’ ही आपली महत्त्वाची गरज बनली आहे. दिसायला लहान असलेल्या या उपकरणात आपण मोठ्या फाईल्स साठवून ठेवतो. पण तुम्ही कधी पेनड्राईव्हकडे बारकाईने पाहिले आहे का? पेनड्राईव्हच्या धातूच्या भागावर दोन लहान चौकोनी छिद्रे असतात. आपल्यापैकी अनेकजण याला केवळ डिझाईनचा भाग समजून दुर्लक्ष करतात; पण ही छिद्रे पेनड्राईव्ह सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डेटा ट्रान्स्फरसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

घट्ट फिटिंगसाठी उपयुक्त जेव्हा तुम्ही पेनड्राईव्ह कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या पोर्टमध्ये लावता, तेव्हा पोर्टमधील धातूचे दोन छोटे फुगवटे या छिद्रांमध्ये जाऊन अडकतात. यामुळे पेनड्राईव्ह पोर्टमध्ये घट्ट बसतो आणि त्यातील मेटल पॉईंटस् यंत्रणेशी व्यवस्थित जोडले जातात. यामुळे पेनड्राईव्ह हलत नाही आणि संपर्क तुटत नाही. योग्य दिशा ओळखण्यात मदत अनेकदा पेनड्राईव्ह उलटा की सुलट हे समजणे कठीण होते. अशा वेळी ही छिद्रे दिशा दाखवण्याचे काम करतात. बहुतांश पेनड्राईव्हमध्ये ज्या बाजूने या छिद्रांमधून आरपार दिसते, ती बाजू वरची किंवा सुलट असते. यामुळे पोर्ट खराब होण्याचा धोका टळतो.

सुरक्षित डेटा ट्रान्स्फर जर पेनड्राईव्ह पोर्टमध्ये सैल बसला, तर डेटा ट्रान्स्फरमध्ये अडथळा येऊ शकतो किंवा फाईल करप्ट (खराब) होऊ शकते. ही छिद्रे कनेक्टरला घट्ट पकडून ठेवतात, ज्यामुळे डेटाची देवाणघेवाण विनाअडथळा पार पडते. यूएसबीचे डिझाईन णडइ- खऋ नावाच्या एका जागतिक संस्थेद्वारे निश्चित केले जाते. जगभरातील कंपन्या याच मानकांचे पालन करतात. म्हणूनच तुम्ही कोणत्याही ब—ँडचा पेनड्राईव्ह विकत घेतला, तरी तो कोणत्याही लॅपटॉप किंवा उपकरणाला सहज फिट होतो.

हे एक जागतिक मानक असल्यामुळे सर्व पेनड्राईव्हवर ही छिद्रे पाहायला मिळतात. पेनड्राईव्हच्या आत असलेला प्लास्टिकचा भाग बाहेरील धातूच्या आवरणाशी घट्ट जोडण्यासाठी ही छिद्रे ‘अँकर’सारखे काम करतात. यामुळे पेनड्राईव्हची अंतर्गत रचना जागेवर स्थिर राहते आणि तो लवकर खराब होत नाही. तसेच, चिप गरम झाल्यावर निर्माण होणारा दबाव कमी करण्यासाठीही या छिद्रांचा थोड्या प्रमाणात उपयोग होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news