‘या’ देशात मिळते सर्वात स्वस्त सोने!

येथे परदेशातूनही लोक सोनं खरेदीसाठी येतात
‘या’ देशात मिळते सर्वात स्वस्त सोने!
Pudhari File Photo
Published on
Updated on

दुबई : भारतातील सोन्याचे दर पाहिल्यावर असा कोणता देश असेल जिथे स्वस्त सोने मिळत असावे, असा प्रश्न कधी ना कधी पडला असेल. भारतात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. सध्या भारतात एक तोळा सोन्यासाठी 84 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जगातील सर्वात स्वस्त सोने मिळणार्‍या या देशात 99.99 टक्के शुद्ध सोने मिळते. म्हणजेच हे सोने भारतात आणून विकले तर भारतातील एक तोळा सोन्याच्या दरापेक्षाही अधिक पैसे मिळतात. हा देश म्हणजे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई!

दुबईमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईनचे अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. दुबईतील सोन्याच्या दर्जावर सरकारचे आणि यंत्रणांचे विशेष लक्ष असल्याने येथील सोने हे सर्वात शुद्ध स्वरुपाचे म्हणजे अगदी 99.99 टक्के शुद्ध असते. दुबईमधील सोन्याचे आजच्या दरांबद्दल सांगायचं तर दुबईत एक तोळा म्हणजेच 10 ग्राम सोने 67 हजार 686 रुपये इतके आहे. दुबईतील दियारा हे सोने खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी सोन्याची अनेक दुकाने असून, येथे परदेशातूनही लोक सोनं खरेदीसाठी येतात. दुबईमध्ये जगातील सर्वात स्वस्त आणि तितकच दर्जेदार सोने मिळते. विशेष म्हणजे या देशात सोन्यावर कोणताही अतिरिक्त कर आकारला जात नाही. त्यामुळेच येथील सोन्याचा दर हा तुलनेने कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news