Diana Revenge Dress | प्रिन्सेस डायना यांचा ‘रिव्हेंज ड्रेस’ ३० वर्षांनंतर पुन्हा चर्चेत

लिलावात कोट्यवधींची बोली लागण्याची शक्यता
Diana Revenge Dress |
Diana Revenge Dress | प्रिन्सेस डायना यांचा ‘रिव्हेंज ड्रेस’ ३० वर्षांनंतर पुन्हा चर्चेत
Published on
Updated on

लंडन : वेल्सची दिवंगत राजकुमारी प्रिन्सेस डायना यांची जगप्रसिद्ध ‘रिव्हेंज ड्रेस’ तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. शाही राजघराण्याचे नियम (Protocol) मोडून प्रिन्सेस डायनाने परिधान केलेल्या या पोशाखाने पॉप कल्चरच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला होता. आता ३० वर्षांनंतर हा ऐतिहासिक ड्रेस लिलावात काढला जाणार आहे.

ग्रीक डिझायनर क्रिस्टीना स्टॅम्बोलियन यांनी डिझाईन केलेला हा शानदार ब्लॅक इव्हनिंग गाऊन या महिन्यात लंडनमध्ये प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. लंडननंतर हा ड्रेस हाँगकाँग, जिनिव्हा आणि शेवटी न्यूयॉर्कला नेला जाईल. तिथे ९ डिसेंबर रोजी त्याचा लिलाव होणार असून, हा ड्रेस सुमारे ३,०००,००० डॉलर (अंदाजे २५ कोटी रुपये) पर्यंत विकला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रिन्सेस डायना यांनी हा काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस २९ जून १९९४ रोजी परिधान केला होता. याच दिवशी त्यांचे पती (आणि सध्याचे किंग चार्ल्स तिसरे) यांनी एका आयटीएन डॉक्युमेंट्री दरम्यान आपल्या विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिली होती. पतीच्या या कबुलीनंतरही खचून न जाता, डायनाने लंडनच्या ‘सर्पेंटाईन गॅलरी’मधील एका पार्टीत अत्यंत आकर्षक आणि बोल्ड अवतारात हजेरी लावली. त्यांच्या या ठाम आणि धाडसी लूकमुळेच या पोशाखाला ‘रिव्हेंज ड्रेस’ असे नाव पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news