आता इंटरनेटशिवाय लॅपटॉपवर चालणार शक्तिशाली ‘एआय’

Powerful ‘AI’ to run on laptops without internet
आता इंटरनेटशिवाय लॅपटॉपवर चालणार शक्तिशाली ‘एआय’
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) जगात एक क्रांतिकारक बदल घडवत, प्रसिद्ध कंपनी ‘ओपन एआय’ने दोन नवीन ओपन-वेट लँग्वेज मॉडेल, GPT- OSS-120 B आणि GPT- OSS-20 B, अधिकृतपणे लाँच केले आहेत. कंपनीचा दावा आहे की, हे दोन्ही मॉडेल प्रगत तर्कशक्तीमध्ये (Advanced Reasoning) पारंगत असून, त्यांना इंटरनेट किंवा क्लाऊडच्या मदतीशिवाय थेट लॅपटॉपसारख्या सामान्य डिव्हाईसवर स्थानिक पातळीवर (Locally) वापरता येणार आहे.

‘ओपन एआय’ ने GPT-2 नंतर सार्वजनिक केलेले हे पहिलेच ओपन-वेट मॉडेल आहेत. या मॉडेल्सचे पॅरामीटर्स (भार) पूर्णपणे खुले ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे डेव्हलपर्सना त्यांना आपल्या गरजेनुसार कस्टमाईज करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. कंपनीच्या मते, हे मॉडेल GPT-4 o सारख्या मोठ्या मॉडेल्सच्या तुलनेत हलके असले, तरी कामगिरीच्या बाबतीत ते अजिबात कमी नाहीत. हे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या उपकरणांसाठी तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचा वापर अधिक सोपा होणार आहे.

GPT- OSS-120 B: हे मॉडेल विशेषतः GPU आधारित शक्तिशाली सेटअपसाठी डिझाईन केले आहे. GPT- OSS-20 B : हे मॉडेल इतके हलके आहे की, ते पर्सनल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरही सहज चालवता येते. दोन्ही मॉडेल्सना केवळ टेक्स्ट डेटासेटवर प्रशिक्षित केले गेले आहे, ज्यात विज्ञान, गणित, तांत्रिक ज्ञान आणि कोडिंग यांसारख्या विषयांचा समावेश आहे. यामुळे हे मॉडेल स्पर्धा परीक्षा, आरोग्य क्षेत्र आणि तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देण्यामध्ये उत्कृष्ट परिणाम देतात. ‘ओपन एआय’ ने जाहीर केले आहे की, हे दोन्ही मॉडेल आता AWS Bedrock प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असतील. तथापि, AWS आणि OpenAI यांच्यातील भागीदारीच्या कराराबद्दल अधिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

यासोबतच, कंपनी नॉर्वेमध्ये आपले पहिले युरोपियन डेटा सेंटरदेखील स्थापन करत आहे. सध्या ‘ओपन एआय’चे बाजारमूल्य सुमारे 300 अब्ज डॉलर (अंदाजे 26,000 अब्ज रुपये) असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, ‘ओपन एआय’ ने अद्याप आपल्या या मॉडेल्सची तुलना डीपसीकसारख्या इतर ओपन-सोर्स एआय मॉडेल्सशी केलेली नाही. असे असले, तरी कंपनीचा दावा आहे की, कामगिरीच्या बाबतीत हे मॉडेल अनेक आघाड्यांवर शानदार सिद्ध होत आहेत आणि भविष्यात ते ‘एआय’च्या जगात मोठे बदल घडवण्याची क्षमता ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news