Poland Sky Angel | पोलंडच्या ‘स्काय एंजेल’ने हवेत चालून दाखवले!

व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्‌
 Poland Sky Angel |
Poland Sky Angel | पोलंडच्या ‘स्काय एंजेल’ने हवेत चालून दाखवले!
Published on
Updated on

लंडन : सोशल मीडियावर तुम्ही आजवर स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण आज आम्ही ज्या व्हिडीओबाबत सांगणार आहोत, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पोलंडच्या एका महिला ॲथलीटने हवेत असा काही पराक्रम करून दाखवला आहे, ज्याने विज्ञानाच्या नियमांनाही आव्हान दिले आहे. या मुलीला पाहून असे वाटते की, तिच्यासाठी जगात ‘ग्रॅव्हिटी’ म्हणजेच गुरुत्वाकर्षण नावाची कोणती गोष्ट अस्तित्वातच नाही. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही ‘स्काय एंजेल’ जिने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.

या मुलीचे नाव आहे माजा कुचिन्स्का. माजा ही पोलंडची रहिवासी असून ती एक अत्यंत प्रसिद्ध ‘एरियल ॲथलीट’ आणि वर्ल्ड चॅम्पियन स्कायडायव्हर आहे. माजा ही कोणी सामान्य स्टंटमन नाही, तर ‘इनडोअर स्कायडायव्हिंग’च्या दुनियेतील एक खूप मोठे नाव आहे. तिने आपल्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट संतुलनाच्या जोरावर अनेक जागतिक विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत. सध्या माजाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजा हवेच्या मध्यभागी अगदी सहजपणे अशा काही हालचाली करताना दिसत आहे, जणू काही ती जमिनीवर सामान्यपणे चालत आहे. तिचे आपल्या शरीरावरील नियंत्रण पाहून लोक थक्कच झाले.

हवेच्या वेगवान प्रवाहामध्ये स्वतःला अशा प्रकारे संतुलित करणे आणि ती आकाशात तरंगत नसून चक्क चालत असल्याचा भास होणे, हे खरोखरच एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वाटत आहे की, हा काहीतरी एडिटिंग किंवा व्हीएफएक्सची कमाल आहे. परंतु, हा व्हिडीओ पूर्णपणे खरा आहे. माजा ही एक व्यावसायिक एरियल परफॉर्मर आहे. इनडोअर स्कायडायव्हिंगदरम्यान खालून हवेचा अत्यंत वेगवान आणि तीव्र दाब येतो, ज्यावर स्वतःला सांभाळणे हे सर्वात कठीण काम असते. मात्र, माजा आपल्या शरीराचा प्रत्येक भाग इतक्या अचूकतेने हलवते की, जणू हवाच तिच्या इशाऱ्यावर नाचू लागते. माजाचा हा व्हिडीओ समोर येताच तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. जगभरातील क्रीडाप्रेमी आणि सोशल मीडिया यूजर्स तिच्या या प्रतिभेचे कौतुक करत आहेत. कोणी तिला ‘रिअल लाईफ सुपरवूमन’ म्हणत आहे, तर कोणी ‘तिने फिजिक्सचे (भौतिकशास्त्राचे) सर्व नियम फेल केले आहेत,’ अशा कमेंटस्‌ करत आहे. तिच्या या गुरुत्वाकर्षणाला चकवा देणाऱ्या कामगिरीने सध्या सर्वांनाच भुरळ पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news