प्लूटोवर हिमनद्या, तरंगता बर्फ आणि बर्फाचे पर्वतही!

‘नासा’च्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लूटोचे जवळून केले निरीक्षण
 pluto has glaciers floating ice and ice mountains
‘नासा’च्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लूटोचे केले निरीक्षण. Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एकेकाळी आपल्या ग्रहमालिकेत स्थान असलेल्या प्लूटोला काही वर्षांपूर्वीच खगोलशास्त्रज्ञांनी एक खुजा किंवा बटु ग्रह (ड्वॉर्फ प्लॅनेट) ठरवून बाहेर काढले. अर्थात, तरीही त्याच्याविषयीचे कुतुहल कमी झालेले नाही. ‘नासा’च्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लूटोचे जवळून निरीक्षण केले होते. त्यावेळी या अवकाशयानाला तिथे गोठलेल्या हिमनद्या दिसून आल्या. तसेच बर्फाच्या तरंगत्या टेकड्याही दिसून आल्या. तेथील भूगर्भीय स्थिती आश्चर्यकारक असून, प्लूटोच्या भूगर्भात अनेक अभिक्रिया घडत असल्याचे स्पष्ट झाले. प्लूटोवर नायट्रोजनचा आणि पाण्याचाही बर्फ आहे.

बर्फाच्या तरंगत्या टेकड्या या अनेक किलोमीटर लांब असून, त्यांची छायाचित्रे ‘न्यू होरायझन्स’ या अवकाशयानाने टिपलेली आहेत. या बर्फाळ टेकड्या प्लुटोवरील हृदयाच्या आकाराच्या स्पुटनिक प्लॅनम या भागात आहेत. त्या भागाच्या पश्चिमेला मोठे बर्फाळ पर्वत आहेत. त्यांची ही लहान आवृत्ती आहे. नासाच्या मते, तेथील भागात अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. पाण्याचा बर्फ हा नायट्रोजन बर्फापेक्षा कमी घनतेचा असल्याने पाण्याच्या बर्फाचे टेकड्यांसारखे भाग तरंगताना दिसतात. त्या गोठलेल्या नायट्रोजनच्या सागरावर आहेत व पृथ्वीच्या आर्क्टिक महासागरातील हिमनगांसारख्या फिरत असतात. या टेकड्या स्पुटनिक प्लॅनम भागातील नायट्रोजन हिमनद्यांवरील साखळीच्या स्वरूपात विखुरलेल्या आहेत. हिमनद्यांच्या प्रवाहात त्या तयार झालेल्या आहेत. या टेकड्या मध्य स्पुटनिक प्लॅनमच्या मध्य भागातही पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे नायट्रोजन बर्फाला गती प्राप्त झाली आहे. विशिष्ट विभागात त्या कडेला ढकलल्या जातानाही दिसतात. त्या 20 किलोमीटपर्यंत पसरलेल्या आहेत. उत्तरेकडील चॅलेंजर कोलेस या भागात जास्त टेकड्या असून, त्या 60 बाय 35 कि.मी. आकारात आहेत. नायट्रोजनचा बर्फ खोलवर आहे; पण पाण्याचा बर्फ वर आहे. न्यू होरायझन्स यानाच्या मल्टिस्पेक्ट्रल व्हिजिबल इमेजिंग कॅमेर्‍याने त्याची प्रतिमा टिपलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news